Hospital CCTV । चंद्रपुरात गुन्हेगारांचा धुमाकूळ! डॉ. मनीष मुंधडा यांच्या केबिनमध्ये रातोरात डल्ला

April 05, 2026 by Prakash Hande

Hospital CCTV Theft News : चंद्रपूर - चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या मुंधडा हॉस्पिटलमध्ये ५ एप्रिल रोजी पहाटे २ अज्ञात चोरटयांनी प्रवेश करीत १ लाख व महत्वपूर्ण दस्तऐवज लंपास केला, याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. शहराच्या मध्यभागी झालेल्या या चोरीने पोलिसांना थेट आव्हान दिले आहे. (बल्लारपुरात देशी कट्टा, तलवार व कोयता जप्त)

 

चंद्रपुरती प्रख्यात मुंधडा हॉस्पिटलमधील कान, नाक व घसा तज्ञ डॉ. मनीष मुंधडा यांच्या केबिनमध्ये ५ एप्रिलला पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास २ अज्ञात इसमांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी झोपेत होते, याचा फायदा घेत २ इसम रुग्णालयात दाखल झाले, शांतपणे पहिल्या माळ्यावर पोहचत थेट मनीष मुंधडा यांच्या केबिनमध्ये शिरले.

 

शोधाशोध केल्यावर टेबलजवळील कपाटाला तोडत त्यामधील रोख रक्कम बाहेर काढली, त्यासह डॉ मुंधडा यांच्या कपाटातील महत्वाचा दस्तऐवज सुद्धा बाहेर काढत चोर बाहेर निघाले, सकाळी हा प्रकार डॉ मुंधडा यांच्या लक्षात आला, त्यांची लगेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली, त्यामध्ये २ अज्ञात इसम केबिनमधील पैसे व कागदपत्रे नेताना दिसत होते. याबाबत मनीष मुंधडा यांनी पोलिसात तक्रार दिली. भल्या पहाटे एका खासगी रुग्णालयात प्रवेश करीत त्यामधील रोख रक्कम व कागदपत्रे लांबविल्याने पोलिसांच्या सुरक्षाप्रणालीवर डॉक्टरांनी शंका उपस्थित करीत पोलिसांनी अश्या घटनांवर आळा घालावा अशी मागणी केली आहे.

Leave a Comment

+