Illegal Weapons Seized : बल्लारपूर - शहरात ३ एप्रिल रोजी तलवार, कोयता सह देशी कट्टा व जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले, या कारवाईत ३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बल्लारपूर शहरात विना परवाना शस्त्र जवळ बाळगत दहशत पसरविण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. (चंद्रपुरात प्रेयसीची हत्या)
रवींद्र नगर वॉर्डात एक इसम स्वतःजवळ देशी कट्टा बाळगत परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलीस रवींद्र नगर भागात पोहोचले, मात्र आरोपीला पोलीस येत असल्याची चाहूल लागताच त्याने कारवा रोड कडे पळाला. पोलिसांनी शासकीय शौचालय जवळ घेरा घालत आरोपी ४० वर्षीय उमाशंकर बरदानी निषाद राहणार रवींद्र नगर वॉर्ड ला ताब्यात घेतले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्ट मध्ये देशी बनावटीचे अग्निशस्त्र व दुसऱ्या खिशात एक जिवंत काडतूस आढळले, विना परवाना शस्त्र बाळगत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी कलम २५, अन्वये गुन्हा दाखल केला, यावेळी पोलिसांनी एकूण २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत २ इसम हे स्वतःजवळ तलवार व कोयता बाळगत सरदार पटेल वॉर्ड कॅम्प परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच कॅम्प परिसरात पोहोचले असता २ इसम हातात तलवार व कोयता घेऊन उभे दिसले.
पोलिसांनी घेराव घालत दोघांना ताब्यात घेतले, दोघांजवळून तलवार व कोयता जप्त करण्यात आला, यावेळी आरोपी ४४ वर्षीय हिरा सोनीलाल बहुरिया राहणार श्रीराम वॉर्ड, बल्लारपूर व ५२ वर्षीय रामजीत मंगल राजभर राहणार सरदार पटेल वॉर्ड यांच्यावर शस्त्र अधिनियम अंतर्गत कलम २५ व ४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीजवळून २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोउपनि अभिषेक जंगमवार, पोलीस कर्मचारी प्रवीण निकोडे, सत्यवान कोटनाके, खंडेराव माने, लखन चव्हाण, गुरु शिंदे, मोहन निषाद यांनी केली.
Leave a Comment