Leopard Attack । काळजाचा ठोका चुकवणारी घटना! बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

March 17, 2026 by Prakash Hande

Leopard Attack : नवरगाव : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे, अडीच महिन्यात ९ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे, १७ मार्चला दुपारी २ वाजता ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले शेतशिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करीत जखमी केले. (बैलाला वाचवायला गेला आणि स्वतः शिकार झाला)

 

शेतातील कामे आटोपून जात असताना फाट्याजवळ पगाणीच्या गवतात शेतकरी राजू देवढगले यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्या ने हल्ला चढविला, या हल्ल्यात देवढगले गंभीर जखमी झाले, जखमी शेतकऱ्याला ब्रम्हपुरी मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

शेतात जाण्यासाठी शेतकरी आता घाबरू लागला आहे, शेतातील कामे करायची असेल तर वन्य प्राण्यांच्या दहशतीमध्ये करावी लागणार. वनविभागाने वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपळगाव भोसले गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Comment

+