आता सुटका नाही! वरोऱ्यात दहशत पसरवणाऱ्या ६ सराईत गुन्हेगारांवर 'मकोका'; पोलिसांची मोठी ॲक्शन

February 28, 2026 by Prakash Hande

MCOCA Action Chandrapur : वरोरा - सराईत गुन्हेगारांनी शहरातील एका बार मॅनेजर वर हल्ला करीत लाकडी दांडा, ग्रॅनाईट चे तुकडे व प्लायवूड ने हल्ला करीत बॅग मधील ७ हजार २०० रुपये लंपास केले, त्या सर्व सराईत गुन्हेगारांना चंद्रपूर पोलिसांनी दणका देत त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. (घरातून सुरु होता गांजा विक्रीचा धंदा, धाड पडली पती पळाला पत्नी अटकेत)

 

६ डिसेम्बर २०२५ ला फिर्यादी प्रसाद देशमाने यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये सराईत गुन्हेगार २२ वर्षीय अमिनेश उर्फ गोलू संजय रेड्डी, २३ वर्षीय प्रणय रतन खातारकार, २२ वर्षीय चेतन नामदेव देवकर, ३१ वर्षीय प्रफुल उर्फ पप्पू धनराज वनकर, १८ वर्षीय ओम मधुकर राऊत व २६ वर्षीय सचिन उर्फ रॉबर्ट अशोक धवणे विरोधात तक्रार दिली कि आरोपींची बेदम मारहाण करीत बॅग मधील रोख रक्कम लंपास केली.

 

वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला, आरोपींची माहिती काढली असता सर्व सराईत अभिलेखावरील गुन्हेगार होते,त्यांनी केलेला गुन्हा टोळी ने मिळून केल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१), (ii), ३ (२), ३ (४) हि वाढीव कलमांव्ये प्रस्ताव तयार करीत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला सदर प्रस्ताव २६ फेब्रुवारीला मंजूर होताच मकोका अंतर्गत कारवाई संबंधित गुन्हेगारांवर करण्यात आली.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी अरुण खारकर, सुधीर मत्ते, परवरिश शेख व किशोर बोडे आणि रुपेश मुल्लेमवार यांनी केली.    

Leave a Comment

+