Mewat Gang ATM Loot Cases : चंद्रपूर : घुग्घूस पोलीस स्टेशन हद्दीत पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम मशीन फोडून तब्बल 10 लाख 92 हजार 800 रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहन राजस्थान राज्यातून हस्तगत करण्यात आले आहे. (चंद्रपुरात मोठा आर्थिक घोटाळा)
दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी मौजा पांढरकवडा येथे अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम मशीनची तोडफोड करून त्यातील रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी घुग्घूस पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 184/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331(4), 334(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा सखोल तपास करताना घुग्घूस पोलिसांची विशेष पथक हरियाणा व राजस्थान राज्यातील मेवात परिसरात रवाना करण्यात आले होते. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा बोलेरो वाहन पोलिसांनी जप्त केले.
दरम्यान, फरार आरोपींच्या शोधासाठी पुन्हा विशेष पथक मेवात येथे पाठविण्यात आले. शोधमोहीमेदरम्यान शैकुल उन्नस खान (वय 26 वर्षे), रा. सावलेर, ता. पहाडी, जि. भरतपूर (राजस्थान) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीला चंद्रपूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. Mewat Gang ATM Loot Cases
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रफुल विलास डाहुले, पोहवा विशाल हुड (ब. नं. 2508), पोहवा अनिल बैठा (ब. नं. 2509), पोशि प्रसन्नजित डोर्लीकर (ब. नं. 2823), पोशि रविंद्र वाभिटकर (ब. नं. 1150) तसेच पोशि नितीन मराठे (ब. नं. 643) यांनी सहभाग घेतला.
घुग्घूस पोलिसांच्या या कारवाईमुळे एटीएम चोरी प्रकरणाचा उलगडा झाला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Leave a Comment