"मम्मी, स्कॉलरशिपसाठी शाळेत जाते"; असं म्हणून निघाली १० वीची मुलगी, पण पुन्हा घरी परतलीच नाही!

February 25, 2026 by Prakash Hande

Minor girl missing : चंद्रपूर - राज्यात अनेक अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहे, आजही अनेक मुलींचा शोध लागलेला नाही, चंद्रपूर शहरात १० व्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी २४ फेब्रुवारीला बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आईने रामनगर पोलिसात दाखल केली आहे. माझी शिष्यवृत्ती आली असून मला थम्ब मारायचे असून त्यासाठी मला शाळेत जायचे आहे असे सांगून अल्पवयीन मुलगी घरून निघाली मात्र ती परत आली नाही. (भावाने केली बहिणीची हत्या)

 

माझी शिष्यवृत्ती आली आहे, मम्मी मला शाळेत जायचं आहे जाऊ का असे म्हणत ती मुलगी घरून निघाली, सायंकाळी ५ वाजले मात्र मुलगी घरी न आल्याने आईने शाळेत विचारपूस करण्यासाठी निघाली मात्र शाळेला कुलूप लावले होते, शाळेतील शिक्षिकेच्या घरी मुलीची आई पोहोचली, मुलीबद्दल शिक्षिकेला विचारले मात्र तुमची मुलगी शाळेत आलीच नाही आम्ही तिला शेल्ट बोलाविले नाही असे सांगितले.

 

आईची चिंता वाढली, मुलीच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली मात्र तिथेही काही माहिती मिळाली नाही, आईने मुलीचा इतरत्र शोध घेतला असता मुलगी कुठेही आढळून आली नाही. मुलीला कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळविल्याचा संशय बळावल्यावर आईने तात्काळ रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.   

Leave a Comment

+