Missing Girls । चंद्रपूर हादरलं! एकाच दिवशी ३ अल्पवयीन मुली बेपत्ता

March 27, 2026 by Prakash Hande

Missing Girls in Chandrapur : चंद्रपूर - जिल्ह्यातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची मालिका सुरूच आहे, बल्लारपूर शहरातून १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी, वरोरा शहरातून १६ वर्षीय मुलगी तर ब्रम्हपुरी मधून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्वाधिक मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण हे ब्रम्हपुरी तालुक्यात आहे. आतापर्यंत १० च्या वर मुली बेपत्ता झाल्या आहे. (३ वर्षांपूर्वी मुलीने पोलीस बापाला मारले, प्रियकराने बिंग फोडलं)

 

 बल्लारपुरातील १२ वर्षीय मुलीने २५ मार्च रोजी आईला आईस्क्रीम खाण्यासाठी १० रुपये मागितले, मुलगी आईस्क्रीम घेण्यासाठी घरून निघाली मात्र परतली नाही त्यामुळे आई-वडील यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नसल्याने, वार्डातील एका मुलाने मुलीला फूस लावून पळविल्याची बाब समोर आली. आई-वडिलांनी मुलाविरोधात बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलीस मुलीचा शोध घेत आहे.

 

 ब्रम्हपुरी मधील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी २५ मार्च रोजी घराबाहेर निघाली मात्र ती परतली नाही, अल्पवयीन मुलगी हि १२ व्या वर्गात आहे, यावर्षी अभ्यास न झाल्याने तिने परीक्षा दिली नाही. २५ मार्चला म्हशीला चारा देण्याकरिता मुलगी बाहेर पडली, मात्र बराच वेळ झाल्याने ती घरी परतली नाही. मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला. शेवटी आई-वडिलांनी मुलीला कुणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये दिली.

वरोरा शहरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी हि वर्ग दहावीमध्ये शिक्षण घेत होती, तिने वर्ष २०२५ मध्ये शिक्षण सोडलं, सध्या ती घरीच असते, २५ मार्चला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान मुलीची मैत्रीण घरी आली, ती म्हणाली कि माझ्या घरी आज कार्यक्रम आहे, मी तुमच्या मुलीला सोबत घेऊन जाते, कार्यक्रम आटोपला कि तिला घरी सोडणार असे सांगितल्याने मुलीच्या आईने होकार दर्शविला.

 

रात्रीचे ९ वाजले मात्र मुलगी घरी न आल्याने पालक चिंतेत होते, त्यांनी थेट मुलीच्या मैत्रिणीच्या घरी धडक दिली, माझी मुलगी कुठे आहे अशी विचारणा केल्यावर तिची मैत्रीण म्हणाली कि मी खर्रा आणायला पान ठेल्यावर थांबली असता ती एका मुलासोबत ऑटोमध्ये बसून निघून गेली. याबाबत अज्ञाताने तिचा अजानतेचा फायदा घेत तिला फूस लावून पळविल्याची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दिली.

Leave a Comment

+