Pet dog dispute Chandrapur : दुर्गापूर (चंद्रपूर) - एका पाळीव कुत्र्यामुळे दोन कुटुंबात भांडणे झाली, त्यानंतर मारहाण आणि थेट अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. दुर्गापूरात पवार व गंधेवार कुटुंबात कुत्रा चावल्यावरून वाद झाला, वाद मारहाणीपर्यंत आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यस्वरूपात बदलला. याप्रकरणी दोन्ही कुटुंबाने एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. (चंद्रपुरात मुली असुरक्षित)
रवी पवार यांच्याकडे पांढऱ्या रंगाचा पाळीव कुत्रा आहे, त्या कुत्र्याला बिना दोरीने सोडल्याने तो सतत वॉर्डातील लोकांच्या अंगावर धावून जातो, यापूर्वी तो कुत्रा ६४ वर्षीय अरुणा गंधेवार यांना चावला होता. १७ मार्चला २० वर्षीय ख़ुशी गंधेवार हि क्लासवरून घरी येत असताना पवार यांचा पाळीव कुत्र्याने खुशीच्या पायाला चावा घेतला. यावरून खुशीने रवी पवार याना जाब विचारत कुत्र्याला बांधून का ठेवत नाही, असे म्हणताच रवी पवार यांनी खुशीचे केस पकडत शिवीगाळी करीत तिला ढकलून दिले.
खुशी चा भाऊ प्रज्वल ने याबाबत पवार याना विचारले तर ते सरळ प्रज्वल च्या अंगावर धावून गेले, प्रज्वल ने वडिलाला बोलाविले मात्र रवी पवार व त्यांचा भाऊ सोमेश यांनी ख़ुशी च्या वडिलाला मारहाण केली, शिला पवार यांनी प्रज्वल ला मारहाण केली. हा वाद दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. ख़ुशी गंधेवारच्या तक्रारीवरून पवार कुटुंबावर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
तर याबाबत पवार कुटुंबातर्फे शिला सोमेश पवार ने दिलेल्या तक्रारीत पवार कुटुंबाला गंधेवार कुटुंबाने मारहाण केल्याची व अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. शीला पवार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले कि माझे भासरे रवी पवार हे ख़ुशी ला दवाखान्यात नेतो म्हणून घरी कपडे बदलण्याकरिता आले असता तितक्यात प्रज्वल गंधेवार व त्याचे वडील मनोज गंधेवार यांनी दगडाने रवी पवार यांच्या डोक्यावर प्रहार केला. Atrocity Act Maharashtra
शीला पवार यांना जातीवाचक शिवीगाळी केली, पवार यांच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी प्रज्वल व मनोज गंधेवार यांच्यावर एट्रोसिटी कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.
Leave a Comment