RTE Admission । RTE प्रवेशासाठी मुदतवाढ! २५ मार्चपर्यंत करा अर्ज; 'या' नियमात झाला मोठा बदल

March 20, 2026 by Prakash Hande

RTE Admission Maharashtra 2026 : चंद्रपूर -  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सीनुसार आर्थिकदृष्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांसाठी खाजगी  विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के मोफत शिक्षणांची तरतूद आहेआरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी कि.मीपर्यंतच्या अंतरावरील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना देण्यात आलेले होतेतथापि उच्च न्यायालयमुंबईखंडपीठ नागपूर येथे दाखल याचिकेवर न्यायालयाने नोंदविलेल्या निरिक्षणानुसार आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश जर किमीअंतरावर शाळा उपलब्ध नसेलतर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाहीत्यानुसार 25 टक्के प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली कि.मीअट रद्द करण्यात आली आहे. (खासगी कोचिंग वर नियंत्रण करा - राष्ट्रवादी कांग्रेसचे मागणी)

 

ज्या पालकांनी कि.मीच्या आत असलेल्या शाळांची निवड करून अर्ज भरलेला आहेतसेच ज्या पालकांनी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नोंदणी केली आहेत्यांना आता किमी., 1 ते कि.मीतसेच कि.मीपेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झालेल्या आहेततरी संबंधितांना आरटीई पोर्टलवर आपला आरटीई 25 टक्केचा अर्ज unconfirm करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

 

त्यानुसार संबंधित पालकांना याबाबत आरटीई 25 टक्के पोर्टलवरून आवश्यक ती माहिती भरून सुधारित अर्ज करता येईलतसेच आरटीई 25 टक्के प्रवेशासाठीचे अर्ज भरण्यास 25 मार्च 2026 पर्यंत मुद्दतवाढ देण्यात आल्याचे पुणे येथील  शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी कळविले आहे.

Leave a Comment

+