Rupali Chakankar Allegations : चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर पदाचा व अधिकृत लेटरहेडचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अशोक खरात उर्फ भोंदू बाबा प्रकरणात त्यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप या आम्ही चंद्रपूरकर महिलांच्या वतीने निवेदनातून करण्यात आला आहे. (केंद्र सरकारकडून ओबीसींची फसवणूक)
वर्षभरापूर्वी भोंदू बाबा प्रकरण उघडकीस आणणाऱ्या एका पत्रकारावर महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अधिकृत पत्राचा वापर करीत पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच, सोबतचं अशोक खरात यांच्या संस्थेला पाणीपुरवठा मिळावा यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या सर्व घटनांमुळे महिला आयोगासारख्या संवेदनशील संस्थेच्या अधिकृत साधनांचा उघड गैरवापर झाल्याचे दिसून येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा प्रकार राज्यातील महिलांची फसवणूक करणारा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, तनिषा भिसे, संपदा मुंडे आणि वैशाली हगवणे या प्रकरणांमध्येही रूपाली चाकणकर यांची भूमिका वादग्रस्त असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणांमध्ये महिलांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, रूपाली चाकणकर यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अशोक खरात प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी ठाम मागणी “आम्ही चंद्रपूरकर महिलांच्या वतीने” जिल्हाधिकारी गौडा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
चंद्रपूरमधील विविध क्षेत्रांतील महिला प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यामध्ये गोमती पाचभाई, अॅड. वैशाली टोंगे, अॅड. वंशिका टोंगे, अॅड. मेघा भाले, अॅड. वर्षा जामदार, अॅड. सारिका संदुरकर, अॅड. प्रतीक्षा वाघमारे, अॅड. समीक्षा नांदुरकर, सौ. बेबीताई उईके, प्रा. शुभांगी आसुटकर, सौ. सीमा वनकर, सौ. उज्वला नलगे, सौ. मंजुषा कुरसंगे, सौ. छबुताई वैरागडे, किरण बालकांडे, मीना बहरिया आणि ममता चंदेल यांचा समावेश होता.
Leave a Comment