शिरीष गोगुलवारांच्या हाती 'कमळ'!, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

March 08, 2026 by Prakash Hande

BJP Entrance Chandrapur : चंद्रपूर -  बीएसपीचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोगुलवार आणि त्यांच्या सोबत असंख्य युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विकासाच्या आणि राष्ट्रहिताच्या वाटचालीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नाहीतर तो राष्ट्रसेवाविकास आणि जनतेच्या हितासाठी काम करणारी एक मोठी विचारधारा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. (माझ्या आईने फुटपाथवर टोपल्या विकल्या आणि आम्हाला मोठं केलं - आमदार जोरगेवार

 

आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत बीएसपीचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोगुलवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या कार्यालयात सदर पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारनगर सेवक संजय कंचर्लावाररॉबिन बिस्वासनामदेव डाहुलेघुग्घूस नगर परिषदेचे नगर सेवक आशिष मासिरकरबलराम डोडाणीतेजा सिंगप्रलय मशाखेतरीसुमित बेले आदिंची उपस्थिती होती.

 

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. तर समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार सातत्याने काम करत आहे. आज देशातील तरुणाई ही विकासाच्या आणि परिवर्तनाच्या विचारांशी जोडली जात आहे. युवकांमध्ये राष्ट्रसेवेची भावना जागृत होत आहे आणि त्या भावनेतून अनेक युवक भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेकडे आकर्षित होत आहेत.

 

आज बीएसपीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या सोबत आलेल्या युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून समाजासाठी आणि विकासासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नक्कीच समाजाच्या आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरेलअसा मला विश्वास आहे. शिरीष गोगुलवार यांनी पूर्वी बसपाला सोडचिठी देत कांग्रेस पक्षात प्रवेश केला, मनपा निवडणुकीची तिकीट न मिळाल्याने गोगुलवार यांनी राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटातून निवडणूक लढविली होती. Shirish Gogulwar

 

भारतीय जनता पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला समान संधी आणि सन्मान मिळतो. येथे कार्यकर्त्यांच्या कष्टांना आणि प्रामाणिकपणाला नेहमीच योग्य स्थान दिले जाते. त्यामुळे आज जे युवक पक्षात प्रवेश करत आहेतत्यांनी समाजासाठी काम करताना जनतेचा विश्वास जपावा आणि पक्षाच्या विचारधारेनुसार कार्य करावेअसे आवाहन त्यांनी यावेळी नवनियुक्त सदस्यांना केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून देत पक्षात स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Leave a Comment

+