Sushma Andhare । संदीप गिऱ्हे यांचा पुढाकार! चंद्रपुरात महिला शक्तीचा जागर; सुषमा अंधारेंचे विचार ऐकण्याची संधी

March 21, 2026 by Prakash Hande

Sushma Andhare Chandrapur Event : चंद्रपूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने ‘महिला सशक्तीकरण सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर महानगरपालिका पटांगण येथे पार पडणार आहे. (RTE च्या नियमात बदल)

 

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या व प्रखर वक्त्या सुषमा अंधारे यांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्या उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत.

 

या सोहळ्याचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. कार्यक्रमाला जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे.

 

महिला सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या या विशेष कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त माता-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

+