Truck Fraud । धक्कादायक! ट्रक विकला पण पैसे मिळालेच नाहीत; पोलिसांनी शोध घेतला तर उरले होते फक्त तुकडे

April 06, 2026 by Prakash Hande

Truck Fraud News : चंद्रपूर - २ ट्र्क विकत घेतले मात्र त्याचे पैसे दिले नाही, खरेदी करणाऱ्याने ट्र्क हडप करीत पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ट्र्क चे तुकडे केले, घुग्गुस पोलिसांच्या तपासात मोठा गुन्हा उघडकीस आला, या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. (चंद्रपुरातील मुंधडा हॉस्पिटलमध्ये चोरी, सीसीटीव्ही मध्ये घटनाक्रम कैद)

 

भद्रावती मधील गोविंद अतुल कुंडू यांनी आपल्या मालकीचे २ टाटा डम्पर ट्र्क क्रमांक MH २९ BE १६५६ व MH २९ BE १६५७ हे साबीर अली सिराजुद्दीन सय्यद राहणार घुग्गुस यांना विकले, नोटरी झाली मात्र ठरल्याप्रमाणे रक्कम न देता ट्र्क आपल्या ताब्यात घेत कुंडू यांची फसवणूक केली.

 

ट्र्कची नोटरी झाली, रक्कम न मिळाल्याने आपले वाहन गेले व पैसे न मिळाल्याने कुंडू यांनी याबाबत घुग्गुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी तपास सुरु केला असता सदर दोन्ही ट्र्क हे साबीर अली ने नागपुरातील जिया उर रहमान उर्फ जिया अन्सारी यांच्या ताब्यात दिले होते. घुग्गुस पोलिसांच्या पथकाने नागपुरात छापा टाकला. जिया अन्सारी पोलिसांना सापडला. अन्सारी ने गुन्ह्याची कबुली दिली मात्र दोन्ही ट्र्क चे गॅस कटरने कापून त्याचे तुकडे केले होते.

 

पोलिसांनी आरोपी अन्सारी कडून चेसिस तुकडे, टायर, ऑइल टाकी, फायबर बॉनेट व इतर अवशेष जप्त केले. मुख्य आरोपी साबीर अली ची माहिती काढली असता तो छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अशेच गुन्हे त्या राज्यात केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

ट्र्क आरोपीने पळविला मात्र फिर्यादीला दोन्ही ट्र्क चे केवळ अवशेष मिळाले, या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी लावला असता एक मोठा गुन्हा उघडकीस आला, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात सपोनि सचिन तायवाडे, सपोनि योगेश पाटील, पोलीस कर्मचारी परमेश्वर डोईफोडे व सहकाऱ्यांनी केली.

 

या घटनेचे गांभीर्य बघता चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले कि वाहन मालकांनी आपले वाहन भाड्याने देताना किंवा विकताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे, जेणेकरून फसवणूक टळणार. वाहन विकल्यावर नोटरीवर विसंबून न राहता संबंधित बँकेचे कर्ज अधिकृतपणे खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यावे. खरेदीदार यांची पार्श्वभूमी आधीच पूर्णतः तपासून घ्यावी. व्यवहार करताना खरेदीदारांची आर्थिक पत व सिबिल स्कोर चेक करावा. आरटीओ मधील वाहनांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय वाहन हस्तांतरित करू नये.  

Leave a Comment

+