Vuenow Scam । ३७१७ कोटींचा महाघोटाळा! तुम्हीही Vuenow मध्ये पैसे गुंतवलेत? तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी 'हे' काम करा

March 19, 2026 by Prakash Hande

Vuenow Scam News : चंद्रपूर - ३ हजार ७१७ कोटी ३० लाख ८२ हजार ९४७ रुपयांची आर्थिक उलाढाल करीत गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा Vuenow Marketing Services Limited या कंपनीचा मुख्य संचालक सुखविंदरसिंग हकमसिंग खरोर राहणार मोहाली पंजाब याला चंद्रपूर पोलिसांनी ११ मार्चला प्रोटेक्शन अटक केली होती. ३ दिवस विचारपूस केल्यावर खरोर यांना लुधियाना मधील खरोर कारागृहात रवानगी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदार यांची फसवणूक झाली असल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. (गडचांदूरात झेंडामुंडीचा खेळ)

 

नमूद कंपनीने इंटरनेट डिव्हाईस डेटा सेंटरमधील क्लाउड पार्टीकल खरेदी व किरायाने देण्याचे करार करण्याचे आमिष दाखवीत गुंतवणूकदारांची फसवणूक सुखविंदरसिंग यांनी केली, गुंतवणूकदारांचे पैसे स्वीकारण्यासाठी १४ वेगवेगळ्या बँक खात्याचा वापर केला असून त्यामध्ये तब्बल ३ हजार ७१७ कोटी ३० लाख ८२ हजार ९४७ रुपयांची उलाढाल झाली. सुखविंदरसिंग यांनी वर्ष २०१६ रोजी कम्पनीची स्थापना केली होती. गुंतवणूकदारांना परताव्याचे आमिष दाखवीत क्लाउड पार्टीकल खरेदी व किरायाने घ्यायला लावले होते. सुखविंदरसिंग यांच्या संपूर्ण देशात ३ हजार ५५८ कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. वर्ष २०२५ मध्ये सुखविंदरसिंग व त्यांच्या पत्नी डिम्पल खरोर यांना ईडी ने अटक केली होती.

 

या कंपनीचे आयसीआय या बँकेत असलेले २८ कोटी ९९ लाख ११ हजार ३४९ रुपये गोठविण्याची कारवाई सुद्धा करण्यात आली, सदर कंपनीत ज्या गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतविले असेल त्यांच्या ठेवी परत मिळण्याकरिता आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूरने गुंतवणूकदारांना आवाहन केले कि वैद्य दस्तऐवजासह ठेवी परत मिळण्याचा फॉर्म भरून देण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापपर्यंत ७ ते ८ गुंतवणूकदार समोर आले आहे. Sukhwinder Singh Kharour

 

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, पोलीस कर्मचारी सुरेश धाडसे, प्रभाकर तलांडे, उज्वल साखरकर, विजू झरकर करीत आहे.  

Leave a Comment

+