"सावधान: १०% व्याजाचा सापळा!", गुजरातच्या 'राजीवभाई'ने चंद्रपुरातील ५१ जणांना कसं लुटलं?

February 14, 2026 by Prakash Hande

Warora forex trading scam : वरोरा (चंद्रपूर) - फॉरेक्स ट्रेंडिंग मध्ये पैसे गुंतवा व त्या गुंतवलेल्या रकमेच्या १० टक्के महिन्याचे व्याज मिळवा असे आमिष दाखवीत गुजरात राज्यातील एका व्यक्तीने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील ५१ नागरिकांकडून तब्बल १ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वरोरा मधील ३९ वर्षीय शरद मांदाडे यांनी दिली. (चंद्रपुरात मोठा आर्थिक घोटाळा)

१९ ऑगस्ट २०२४ ला फिर्यादी मांदाडे यांच्याकडे त्यांचा मित्र संदीप वगरे हे गुजरात राज्यातील राजीवभाई देसाई या व्यक्तीला वरोरा मध्ये घेऊन भेटण्यास आले होते. त्यावेळी देसाई यांनी आपण मला काही ठराविक रक्कम दिली तर त्यावर मी १० टक्के व्याज म्हणून परतावा देणार व हा परतावा आपल्याला दार महिन्याला मिळेल असे सांगितले. देसाई यांच्यावर विश्वास नसल्याने मित्र वगरे यांनी विश्वास दर्शविला कि मी यांच्यासोबत बिझनेस केला असून आपणही पैसे गुंतवा आपल्याला चांगला फायदा मिळेल असे सांगितले. मांदाडे यांना विश्वास बसल्यावर त्यांनी २० सप्टेंबर २०२४ रोजी देसाई यांच्या FX Trust Investment Business असणाऱ्या N.R. Enterprises च्या नावाने ४ लाख २५ हजार रुपये आरटीजीएस व रोख ७५ हजार असे ५ लाख रुपये पाठविले.

सदर पैसे मी फॉरेक्स ट्रेंडिग मध्ये गुंतवणार असून त्यामधून जो फायदा होणार त्या नफ्याचे मी आपणाला दार महिन्याला १० टक्के व्याज देणार असे देसाई यांनी सांगितले. तुमचे पैसे पूर्णतः सुरक्षित राहतील तीन महिन्यांनी मला आपण मुद्दल रक्कम मागितली तर मी ते आपल्याला परत देणार असे देसाई यांनी सांगितले. तुला जर पुन्हा पैसे कमवायचे असतील तर या गुंतवणुकीबाबत तू इतरांना माहिते दे म्हणजे तुला पुन्हा फायदा होणार असे आमिष देसाई यांनी मांदाडे ला दिले होते.

या प्रलोभनाला बळी पडत मांदाडे यांनी असंख्य नागरिकांना गुंतवणुकीचे फायदे सांगत कोट्यवधी रुपये गुंतवूणक कार्य लावले, सुरुवातीचे ८ महिने मांदाडे यांना दार महिन्याला ५० हजार रुपये व्याज स्वरूपात त्यांच्या खात्यात जमा झाले, या काळात देसाई हे अनेकदा वरोरा शहरात बिझनेस बाबत मिटींगा घेऊ लागले होते, अनेकांनी त्यांच्यावर विश्वास दर्शवित पैसे गुंतविले.

जुलै २०२५ पर्यंत अनेक गुंतवणूकदारांना महिन्याचे पैसे जमा होत गेले मात्र त्यानंतर पैसे येणे बंद झाले, पैसे का बरं येणे बंद झाले अशी विचारणा गुंतवणूकदारांनी देसाई यांना केली असता ते म्हणाले कि सध्या अपडेट सुरु असून पैसे विड्रॉल होत नाही आहे, त्याला काही वेळ लागेल नंतर पैसे येणे पुन्हा सुरु होणार, मात्र काही काळ लोटल्यावर सुद्धा पैसे न आल्याने गुंतवणूकदारांनी देसाई यांना फोन द्वारे विचारणा करणे सुरु केले असता त्यावेळी देसाई हे उड्विडवीची उत्तरे देऊ लागला, आमची फसवणूक झाली असे समजताच मांदाडे थेट गुजरातला राजीवभाई देसाई यांच्या घरी गेले, मांदाडे म्हणाले कि मी ज्यांना आपल्याकडे पैसे गुंतवूणक करायला लावले ते सर्व मला पैसे परत मागत आहे, देसाई यावर म्हणाले कि अजून दोन ते तीन महिने लागेल, मांदाडे यांनी माझ्यासोबत वरोरा मध्ये चला व सर्वाना समोरासमोर सांगा तेव्हा सर्वाना कळेल नेमकी परिस्थिति काय आहे. Warora forex trading scam

११ सप्टेंबर २०२५ रोजी मांदाडे व राजीव देसाई हे सोबत वरोरा मध्ये आले, त्यावेळी गुंतवणूकदार देसाई यांना मुद्दल पैसे परत करा अशी विचारणा करू लागले, यावर देसाई यांनी काही जणांना धनादेश दिला, मात्र सदर धनादेश बँकेत जमा केला असता खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटला नाही, सर्व गुंतवणूकदारांनी राजीव देसाई ला वरोरा पोलीस स्टेशनमध्ये नेले, मात्र पोलिसात गुन्हा दाखल झाला तर २ ते ३ वर्षे पैसे मिळणार नाही असा विचार आल्यावर गुन्हा दाखल न करता एका स्टॅम्प पेपरवर ११ फेब्रुवारी २०२६ ला सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील असे लिहून घेतले पैसे परत मिळाले नाहीतर त्याची जमीन विकण्याचा अधिकार गुंतवणूकदारांचा राहणार. 

राजीव देसाई यांनी गुंतवणूकदारांचे पैसे ठरलेल्या दिवशी परत केले नाही त्यामुळे मांदाडे यांनी राजीव देसाई यांच्या ५१ नागरिकांची १ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. गुंतवणूकदारांना आकर्षक रकमेचा परतावा देण्याचे आमिष देत फसवणूक करण्याचा प्रकार देसाई यांनी बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा केल्याची माहिती आहे. पोलिसांनी विविध कलमांव्ये देसाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

Leave a Comment

+