Yuvasena Chandrapur Appointment : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात पक्षसंघटना अधिक बळकट होत असून जिल्ह्यातील युवक सहारे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत प्रवेश करीत आहे. २२ मार्च रोजी, युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना सचिव मा. वरुण सरदेसाई, कार्यकारिणी सदस्य मा. हर्षल काकडे आणि जिल्हा विस्तारक मा. संदीप रियाल पटेल यांच्या सूचनेनुसार, युवासेना जिल्हाप्रमुख मा. विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात श्री. पवन उडाके यांची चंद्रपूर येथील युवासेना उपतालुका प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. (RTE च्या नियमात बदल)
या प्रसंगी युवासेना तालुका समन्वयक सागर गभने, विवान (मिथुन) रामटेके यांच्यासह चंद्रपूर शहरातील अनेक युवकांनी—अभिजीत मेश्राम, कुणाल पुसदकर, गणेश राखुंडे, रितिक रायपुरे, कार्तिक कोडापे, हर्ष उरकुडे, दिनेश डाकरे, ओमकार गुरशेट्टीवार, फैजल खान, रोशन पारोधी, आदेश पाटील, संगम निमगडे, अंशु रायपुरे, सागर रायपुरे आदींनी—युवासेनेत प्रवेश करून संघटनेला बळकटी दिली.
नवीन जबाबदारी स्वीकारल्याबद्दल श्री. पवन उडाके यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे युवासेना संघटना अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Leave a Comment