प्रतिभा धानोरकर संसदीय समिती सदस्य म्हणून खासदार धानोरकर

खासदार प्रतिभा धानोरकर यांची कोळसा, खाणी व पोलाद संसदीय समितीवर पुनर्नियुक्ती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 5, 2026

चंद्रपूर : प्रतिभा धानोरकर संसदीय समिती : चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची वर्ष २०२६-२७ साठी ‘कोळसा, खाणी आणि पोलाद उद्योग’ या संसदीय स्थायी समितीवर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार लोकसभा बुलेटिन भाग-२ द्वारे ही घोषणा करण्यात आली. ही नियुक्ती २६ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाली आहे.

समितीच्या अध्यक्षपदी खासदार अनुराग सिंह ठाकूर यांची नियुक्ती लोकसभा अध्यक्षांनी केली आहे. (आश्रमशाळेतील ८२ मुलांचे अर्धंटक्कल, वाचा हि बातमी)

लोकसभा सचिवालयाने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, लोकसभा बुलेटिन भाग-२ (परिच्छेद क्र. ६१८७) द्वारे या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही नियुक्ती २६ सप्टेंबर २०२६ पासून अमलात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी खासदार अनुराग सिंह ठाकूर यांची नियुक्ती माननीय लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आली आहे.

चंद्रपूर व परिसरातील कोळसा आणि खनिज क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न, कामगारांचे हित, पर्यावरण संतुलन आणि स्थानिक उद्योगांचा विकास यावर खासदार प्रतिभा धानोरकर या समितीच्या माध्यमातून संसदेत प्रभावीपणे आवाज उठवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment