चंद्रपूर : Pratibha Dhanorkar Samagra Shiksha अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सातत्याने आक्रमक लढा देत होत्या. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे.
राज्य सरकारने ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय नुकताच निर्गमित केला आहे. (हे हि वाचा – ताडोबातील होम स्टे चालकांना जागतिक व्यासपीठ)
समग्र शिक्षा अभियानांतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या मानधनावर आणि सेवेच्या अनिश्चिततेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. तत्कालीन आमदार असताना सर्वप्रथम विधानसभेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून मागणी करणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकार व प्रशासनाकडे सातत्याने आक्रमक पाठपुरावा केला. त्यांच्या याच सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीत अधिसंख्य पदे निर्माण करून सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे.
शालेय शिक्षण विभागात १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून अधिसंख्य पदांवर समाविष्ट केले जाणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदार असल्यापासून ते आता खासदार होईपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या व्यथा शासनदरबारी मांडून त्यांच्या सेवा सुरक्षेसाठी लढा दिला, त्यामुळेच हा निर्णय शक्य झाला आहे. या निर्णयानुसार १० वर्षे व त्याहून अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या ३,२७६ कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीत अधिसंख्य पदे निर्माण केली जातील. तसेच ७ व्या वेतन आयोगानुसार समकक्ष पदांची वेतनश्रेणी निश्चित करून कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन संरक्षित ठेवले जाईल व त्यांना महागाई व प्रवास भत्ता लागू राहील. या अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांच्या सेवेची कमाल वयोमर्यादा ५८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
दीर्घकाळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या ऐतिहासिक पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मनापासून आभार मानले जात आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






