Sand Smuggling प्रकरणात चंद्रपूरातील बल्लारपूर येथे पोलिसांनी जप्त केलेला ट्रॅक्टर आणि अवैध रेती दिसत आहे.

Sand Smuggling । बल्लारपूरात अवैध रेती तस्करीवर LCB ची कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 14, 2026

Sand Smuggling : बल्लारपूर – स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी बल्लारपूर परिसरात अवैध रेती तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली असून यामध्ये दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बल्लारपूरात वर्धा नदी पात्रातून सुरू होती अवैध Sand Smuggling

वर्धा नदीच्या पात्रातून गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना एका गुप्त खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारपूर येथे छापा टाकला असता, विना क्रमांकाच्या ट्रॉलीसह रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पथकाच्या जाळ्यात अडकला. (गुन्हे शाखेच्या कारवाईत १० पेट्या दारू जप्त)

या कारवाई दरम्यान पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर (क्रमांक MH34BV 2632) आणि १० हजार रुपये किमतीची एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी विनोद विठ्ठल आत्राम या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुनमचंद बहुरिया हा दुसरा आरोपी सध्या फरार आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ४९ सह जमीन महसूल कायद्याच्या कलम ४८(७), ४८(८) आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Sand Smuggling

स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय सर्वेश बेलसरे आणि ब्रह्मपुरी उपविभागाच्या पथकाने ही धाडसी कारवाई यशस्वीपणे पार पाडली. नदी पात्रातून होणारी पर्यावरणाची हानी आणि शासकीय महसुलाची चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत असून या तस्करीमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment