Movement of project victims | हंसराज अहिर यांच्या मध्यस्तीने प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

Movement of project victims
Movement of project victims Movement of project victims : वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलेरा व पिंपरी या गावाची पुनर्वसन प्रकीया मागील ३० वर्षांपासून सुरू न झाल्याने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी दि. २५ जानेवारी २०२५ रोजीपासून खाणीमध्ये कामबंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेवून पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (hansraj ahir) यांनी वेकोलिचे सीएमडी यांचेसोबत पुनर्वसन विषयक प्रलंबित प्रश्नांबाबत दुरध्वनीवरून विस्तृत चर्चा केली व आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलकांच्या मागणीस पाठिंबा देत मुख्य महाप्रबंधक वणी नॉर्थ क्षेत्र यांचे उपस्थितीत पुनर्वसन व अन्य न्याय मागण्यांच्या पुर्ततेकरिता पुढाकार घेवून महिनाभरात विषय मार्गी लावण्याचे आश्वासन क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ यांचेकडून देण्यात आले. उच्च विस्फोटक निर्मनी येथे पदभरती, आजच करा अर्ज मुख्य महाप्रबंधक यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनानुसार महिनाभरामध्ये दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्त यादीचा विषय मार्गी लावून सन २०१९ पर्यंतची प्रकल्पग्रस्तांची नवीन यादी व २०११ ची जुनी यादी नुसार दोन्ही प्रस्ताव मुख्यालयाला सादर करून नवीन यादी धारकांकडून आवश्यक कागदोपत्री पुरावे मागवून कुंटूबाच्या अंतर्गत झालेले मालकीहक्क फेरफार ग्राह्य धरून पुनर्वसन लाभधारक यादीला अंतिम मान्यता द्यावी असे अहीर यांनी सांगितले. अहीर यांच्या मध्यस्थीने सुचविण्यात आलेल्या तोडग्याच्या आधारे प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी आपले खाणबंद आंदोलन मागे घेतले. चंद्रपुरात नाना – नानी पार्कचे उदघाटन आंदोलनामध्ये चर्चेदरम्यान यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदुरकर, बंडु चांदेकर, साधना उईके सरपंच कोलेरा पिंपरी, उपसरपंच केशव पिदुरकर, पवन एकरे, अतुल बोंडे, प्रियंका सातपुते, दिपक मत्ते, महेश देठे, बंडु खंडाळकर, बालु खामनकर, अनिल बोढाले, शंकर खामनकर व दोन्ही गावातील आंदोलनकर्ते प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
Read more

Chandrapur Bjp leader : आमदार जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपात….

Chandrapur bjp leader
chandrapur bjp leader भारतीय जनता पार्टीमध्ये विद्यमान आमदार किशोर जोरगेवार व राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माना समाजाचे दिग्गज नेते डाॅ. रमेशकुमार गजभे यांची घरवापसी झाल्याने पक्षाची राजकीय ताकद शतपटीने वाढली असून या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपाला पुनर्वैभव प्राप्त होईल असा विश्वास पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. Chandrapur bjp leader जिल्ह्यात भाजपाचे प्रबळ ...
Read more

wcl chandrapur : स्थानिकांना आधी रोजगार द्या – हंसराज अहिर

Wcl chandrapur
wcl chandrapur जिल्हयातील वेकोलि क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या खासगी ओबी (माती) कंपन्यांनी राज्यशासनाच्या स्थानिक पातळीवर रोजगारसंदर्भातील ८०*२० अनुपात धोरणाशी अधिन राहून प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील स्थानिक बेराजेगारांना सामावून घेण्यास प्राधान्यक्रम द्यावा व या संपूर्ण कार्यवाहीवर अंमल करवून घेण्याकरिता संबंधित शासकीय यंत्रणांनी नियंत्रण ठेवत या कंपन्याना स्थानिकांना रोजगार देण्यास बाध्य करावे असे सक्त निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले आहेत. wcl chandrapur स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी वेकोलि वणी, माजरी व बल्लारपूर क्षेत्रीय कार्यालयाचे महाप्रबंधक व ओबी कंपन्याच्या व्यवस्थापनासोबत आढावा बैठक घेत आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलिशी संबंधित विविध प्रश्न, समस्या व अन्य बाबींचा सविस्तर आढावा घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यपूर्ततेबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. अवश्य वाचा : चंद्रपूर पोलिसांमुळे झाला पुरुषोत्तम चा मृत्यू, कुटुंबाचा खळबळजनक आरोप या बैठकीस माजी आ. अॅड संजय धोटे, भाजपा नेते खुशाल बोंडे, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रघुवीर अहीर, राजु घरोटे, मधुकर नरड, धनंजय पिंपळशेंडे, उमेश बोढेकर, पवन एकरे, राजेश तालावार, किशोर बावने, संजय तिवारी, सुदेश उपाध्याय, येनकच्या सरपंच कल्पना टोंगे, पाटाळाचे सरपंच विजयेंद्र वानखेडे, वेकोलि माजरीचे क्षेत्रीय महाप्रबंधक प्रमोद कुमार, वणी क्षेत्राचे आभासचंद्र सिंह, बल्लारपूर क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे ऋतुराज सुर्य आदीची उपस्थिती होती. (wcl chandrapur) वेकोलि प्रकल्पप्रभावित गावातील ओबीसी व अन्य प्रवर्गातील बेरोजगारांच्या रोजगारविषयक ओबी कपन्यांविषयी रोजगाराबाबत गंभीर स्वरूपाच्या तकारी प्राप्त झाल्याने ही आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आयोगाद्वारे नव्याने प्रस्तावित खाणीबाबत तिन्ही वेकोलि क्षेत्राचा कार्य आढावा घेण्यात आला. उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांकडून अहीर यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. मुंगोली प्रकल्प सेक्शन-७ करीता प्रस्तावित झाल्याच, कोलगाव सेक्शन-९ करीता प्रस्तावित होत असल्याचे व गाडेगाव सेक्शन-९ करीता प्रस्तावित झाल्याची माहिती वेकोलि अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. वणी क्षेत्रातील ग्राम-मुंगोली  पूनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे तसेच उकणीचे पुनर्वसन प्रस्तावित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आयोगास दिली. माजरी क्षेत्रातील मार्डा गावाच्या पुनर्वसनाची मागणी असल्याचे तसेच बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी सेंट्रल प्रकल्प सेक्शन-४ करीता प्रस्तावित झाल्याची माहिती वेकोलिने दिली. गोवरी-पोवनी एकत्रिकरण, बल्लारपूर नार्थ-वेस्ट  सेक्शन-९ करीता प्रस्तावित असल्याची माहितीसुध्दा यावेळी देण्यात आली. (wcl chandrapur) राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्षांनी या सर्व प्रकल्पातील पुनर्वसन प्रस्तावित गावातील १०% पेक्षा कमी उर्वरित जमिनींचे अधिग्रहण करून पुनर्वसन प्रकीयेला गती देण्याची सुचना उपस्थित क्षेत्रीय महाप्रबंधकांना दिल्या बैठकीमध्ये सर्वच प्रकल्पातील ५ वर्ष कालमर्यादा कारणास्तव प्रलंबित नोकरी प्रस्तावांचा सुध्दा अहीर यांनी आढावा घेतला. वेकोलि क्षेत्रात कार्यरत ओबी कंपन्यांमधील एकुण मनुष्यबळ त्यापैकी स्थानिकांची नोकरीतील टक्केवारी, एचपीसी नुसार वेतन, कामगाराकरिता वैद्यकीय सुविधा, विटीसी, पोलीस वेरीफिकेशन आदी बाबतही अहीर यांनी माहिती जाणून घेतली स्थानिकांना ८०% रोजगार देण्याकरिता शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल याची गांर्भीयाने दक्षता घेण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्याऱ्यांना दिले. वेकोलि भुमीअधिग्रहीत गावातील तसेच परिसरातील शिक्षित व व्यावसायिक शिक्षण पात्र बेरोजगार युवकांनी ओबी कंपन्यांमध्ये रोजगार मिळवण्याकरिता वेकोलिच्या सर्व क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयाकडे आवेदन करण्याच्या सुचना सुध्दा हंसराज अहीर यांनी केल्या आहेत.
Read more

Hansraj Ahir ncbc : ओबीसींच्या नोकऱ्यातील अनुशेष आरक्षण धोरणानुसारच पूर्ण करा – हंसराज अहिर

Hansraj ahir ncbc
Hansraj ahir ncbc विविध राष्ट्रीयकृत बँका, जीवन विमा कंपनी, रिझर्व बँक ऑफ इंडिया व केंद्रीय आस्थापनातील नोकर भरती, ओबीसी प्रवर्गातील कार्यरत कर्मचारी, अधिकारी, आरक्षण रोष्टर नुसार कार्यवाही यासह अन्य बाबींचा सविस्तर आढावा संबंधित आस्थापनाच्या आयोजित बैठकीमध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात घेतला. अवश्य वाचा : योजनादुत बना आणि 10 ...
Read more

hansraj ahir : 2 महिन्यात प्रकरणे निकाली काढा – आयोग अध्यक्ष हंसराज अहिर

Hansraj ahir public hearing
hansraj ahir चंद्रपूर :- भोगवटदार वर्ग-2 चे भोगवटदार वर्ग-1 मध्ये वर्गीकरण करून भूधारकाला भूमिस्वामी बनविण्यात संदर्भातील प्रलंबित व कार्यवाहीकरीता दाखल केलेली ओबीसी व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रकरणे येत्या 2 महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आयोगाद्वारे राजुरा येथे घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये दिले. अवश्य वाचा : चंद्रपूर वन ...
Read more

Hansraj Ahir : 18 ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित होणार समावेश – हंसराज अहिर

Hansraj ahir
hansraj ahir महाराष्ट्र सरकारने राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास केलेल्या शिफारसीवर दि. 26 जुलै रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने जनसुनावणी घेत अहवालातील त्रुटींची पुर्तता झाल्यानंतर या सर्व जातींना केंद्रीय सुचीमध्ये समाविष्ट केले जाईल अशी ग्वाही जनसुनावणीस उपस्थित समाजबांधवांना दिली. अवश्य वाचा : चंद्रपूरात 2 युवकांचा जीवघेणा स्टंट Hansraj ahir मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या केंद्रीय ओबीसी आयोगाच्या या जनसुनावणीला विभागाचे प्रधान सचिव, सचिव, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सचिव, केंद्रीय आयोगाचे सदस्य कमल भुषण, सचिव, सल्लागार व राज्याचे वरीष्ठ अधिकारी यांचेसह 16 जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा होणार या जनसुनावणीमध्ये आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित सचिव व संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल व प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता करून उर्वरीत माहिती आयोगास लवकरच सादर करावी असे निर्देश दिले. या जनसुनावणीला उपस्थित असलेल्या विविध जातींच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करून निर्देशानुसार आवश्यक त्रुटींची पुर्तता केल्यानंतर व विषयानुशंगाने काटेकोर माहिती असलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनात्मक बाबी तपासुन या सर्व 18 जातींचा समावेश केंद्रीय सुचीमध्ये करण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले.
Read more

Union Budget Date : आजचा अर्थसंकल्प विकासाचा रोड मॅप

Union budget pdf
Union budget date विकसित भारत घडविण्याचे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या भक्कम जडणघडणीस तसेच गरीब, शेतकरी, युवा व महिला उत्थानास नवी दिशा देणारा असून हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यास साह्यभुत ठरणारा असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर ...
Read more

Pilgrimage : चंद्रपुरातील 400 नागरिक पुण्यभूमी अयोध्येसाठी रवाना

Prabhu shri ramchandra
News34 chandrapur चंद्रपूर – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ४०० प्रवाशांच्या तुकडीचे स्वागत केले. हे भाविक प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी पुण्यभूमी अयोध्येकडे प्रवासाला निघाले होते. बल्लारशाह-अयोध्या ही विशेष ट्रेन (क्र. ०१५९) चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून २० फेब्रुवारी रोजी निघाली. Pilgrimage     दुपारी 12:15 ...
Read more

chandrapur to pune trains : चंद्रपूरकरांनो थेट मुंबई, पुणे जाण्याचा मार्ग मोकळा

Chandrapur to mumbai trains
News34 chandrapur चंद्रपुर – चंद्रपूर आणि मुंबई/पुणे दरम्यान थेट रेल्वे कनेक्शन नसल्यामुळे, जिल्ह्यातील रहिवाशांना, ज्यामध्ये विद्यार्थी, पालक आणि व्यापारी यांचा समावेश आहे, त्यांना पर्यायी पर्याय शोधावे लागले आहेत किंवा नागपूरहून त्यांचा प्रवास सुरू करावा लागला आहे. या समस्येचे महत्त्व ओळखून, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या समस्येचे निराकरण करण्यात ...
Read more

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हंसराज अहिर यांच्या बैठकीचा धडाका

महाविजय 2024
News34 chandrapur चंद्रपूर / यवतमाळ – विकसीत व सामर्थ्यशाली भारत घडविण्याची ताकद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वात असल्याने ‘महाविजय 2024’ चे लक्ष्य गाठण्यासाठी व देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोदीजींच्या हाती सोपविण्यासाठी प्रत्येक बुथवर 50 टक्के मतदान हे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून सुपर वॉरीयर्सनी आपल्या जबाबदारीला न्याय द्यावा अशी सुचना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र ...
Read more
error: Content is protected !!