संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

News34 chandrapur

चंद्रपूर – 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस स्वतंत्र भारतासाठी मोठा ऐतिहासिक दिवस होता. तो समस्त भारतीयांसाठी सोनेरी क्षण सुध्दा होता. संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला याच दिवशी संविधान सोपविले होते व संविधान सभेने विधीवत स्वरुपात स्वीकारत देशाला संविधान समर्पित केले. या संविधानाने लोकशाहीची पुनर्स्थापना करीत देशात समानता, न्यायहक्क, बंधुभाव दिला आहे. आज संविधान हा राष्ट्रीय दिन म्हणुन साजरा होत असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सांगतानाच उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2015 मध्ये संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय घेवून भारतीय संविधानाबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात जबाबदारीची भावना निर्माण केली आहे असे ते म्हणाले. सुरुवातीला हंसराज अहीर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहुन संविधानाप्रती सन्मान व निष्ठा राखण्याचे सर्वांना आवाहन केले.

 

          याप्रसंगी खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, रवि गुरनूले, धम्मप्रकाश भस्मे, अॅड. राहुल घोटेकर, राजेंद्र अडपेवार, सविता कांबळे, रेणुका घोडेस्वार, स्वप्निल कांबळे, राहुल सुर्यवंशी, शीलाताई चव्हाण, शीतल गुरनुले, श्याम कनकम, किरण बुटले, राहुल सुर्यवंशी, स्वप्निल मुन, दिनकर सोमलकर, राजेश थुल, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लिवार, रवि लोणकर, राजेंद्र खांडेकर, प्रलय सरकार, अनिल सुरपाम, चंदन पाल, चांद सय्यद, अमित निरांजने, जहीर रजा, विक्की मेश्राम, राहुल नगराळे, जितेंद्र वाकडे, सुनिल महातव यांचेसह भाजपा पदाधिकारी व विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!