Tribal Development Exam Chandrapur schedule update notification

चंद्रपूर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, सुधारित प्रवेशपत्र जाहीर

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 27, 2026

चंद्रपूर : Tribal Development Exam Chandrapur संदर्भात आदिवासी विकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील गट-ड संवर्गातील चौकीदार भरती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा आता २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिफ्ट-१ मध्ये होईल. उमेदवारांनी नवीन सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करावे. (हे हि वाचा – अधिपरिचारिका सोबत चंद्रपुरात मन कि बात संपन्न)

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार होती. मात्र, परीक्षार्थींकडून प्राप्त झालेल्या परीक्षा केंद्र बदलाबाबतच्या विनंत्या व निवेदनांचा विचार करून परीक्षा केंद्र व वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.

चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा २८ जुलै २०२६ रोजी शिफ्ट-२ मध्ये होणार होती. मात्र, आता या परीक्षेच्या दिनांक व शिफ्टमध्ये बदल करण्यात आला असून, संबंधित उमेदवारांची परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी शिफ्ट-१ मध्ये सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन सुधारित प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, इतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना त्यांनी पसंती दिलेल्या परीक्षा केंद्रांपेक्षा लांबचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. या उमेदवारांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. मात्र, संबंधित उमेदवारांच्या परीक्षेच्या दिनांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सर्व उमेदवारांनी आपले सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील परीक्षा केंद्र, दिनांक, शिफ्ट व वेळ यांची खात्री करावी, असे आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment