7 वर्षीय आकांक्षाला मिळाला भद्रावती भूषण पुरस्कार

News34

भद्रावती –  स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट समारंभ व भद्रावती नगर परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त “भद्रावती भूषण पुरस्कार” व “भव्य सांस्कृतिक कार्यक्रम” असे संयुक्त आयोजन भद्रावती येथील मुरलीधर पाटील गुंडावार सभागृहात करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर ,नगराध्यक्ष अनिल धानोरकर,न.प. उपाध्यक्ष संतोष आमणे ,मुख्याधिकारी विशाखा शेळके, उपमुख्य अधिकारी गायकवाड नगरपरिषदेचे सर्व समित्यांचे सभापती यांचेसह बहुसंख्य नगरसेवकांची मंचावर उपस्थिती होती.

योग क्षेत्रातील विषेश पुरस्कार डॉक्टर ज्योती देवराव देऊरकर यांना व योग क्षेत्रातीलच दुसरा विशेष पुरस्कार कुमारी आकांक्षा आकाश कटलावार या सात वर्षीय मुलीला देवून तिला गौरविण्यात आले. शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ.ज्योती देऊरकर या कु.आकांक्षाच्या योग कलेच्या गुरु आहेत. या डॉ.ज्योती व की.आकांक्षा या दोन्ही गुरु शिष्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे.

आकांक्षाचे वडील दिल्ली येथे सैनिक दलात असुन देश सेवेसाठी कार्यरत आहेत. आकांक्षा वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासूनच योग शिक्षिका डॉ. देऊरकर यांच्याकडून योगा संबंधीचे धडे घेत आहे. तिच्या घेतलेल्या परिश्रमामुळेच वयाच्या सातव्या वर्षी आकांक्षा ला “भद्रावती भुषन पुरस्कार” देवुन तिला गौरविण्यात आले आहे.

पुरस्कार स्वीकारताना आकांक्षा सोबत तिच्या गुरु, आजी,आजोबा,आई सौ.किशोरी कटलावार,मोठी आई व इतर नातेवाईक आप्तेष्टांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमांत उपस्थित भद्रावती नगर वासियांनी आकांक्षाला प्रत्यक्ष भेटून अभिनंदनाचा वर्षाव केला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!