Sunday, September 24, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपूरच्या आमदाराने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

चंद्रपूरच्या आमदाराने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

होमगार्ड च्या मागण्यांवर चर्चा

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – विविध मागण्यांना घेऊन होमगार्ड महासंघाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत होमगार्ड यांच्या रास्त मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील होमगार्ड हे पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी तत्पर असतात. परंतु सद्यास्थितीत त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असून राज्यातील होमगार्ड यांच्या प्रमुख २० मागण्यांसाठी त्यांनी मुंबई येथील आजाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे.

महाराष्ट्र होमगार्ड अॅक्ट 1947 मध्ये सुधारणा अथवा बदल करण्यात यावा, भारत सरकारच्या आदेशानुसार होमगार्ड यांना 365 दिवस नियमित रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा, महाराष्ट्र होमगार्ड अॅक्ट 1947 मधील दर 3 वर्षानी होणार्या पुनरनोंदणी पुनर्नियुक्ती प्रणाली पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, महाराष्ट्र होमगार्ड अॅक्ट 1947 मधे बॉम्बे पोलीस अॅक्ट प्रमाणे किंवा प्रादेशिक सेना टि.ए 118 इन्फैंट्री बटालियन या धर्तीवर सुधार करण्यात यावा, मानसेवी कर्मचारी पद आणि वेतनिय कर्मचारी पद असे भेदभाव चे प्रकार नष्ट करून महाराष्ट्र होमगार्ड विभागात होमगार्ड सैनिकांना प्रतिनिधित्वाची समान संधी देण्यात यावी.

तसेच पोलीस विभाग प्रमाणेच होमगार्ड विभागा करिता स्वतंत्र बजट ची व्यवस्था तसेच प्रतिवर्ष महामाई दरानुसार महागाई भत्ता देण्यात यावा, साप्ताहिक परेड भत्ता, उजळणी प्रशिक्षण भत्ता व तसेच आगामी काळात मध्ये येणारे सर्व प्रशिक्षण भत्ता व त्याचप्रमाणे शासनाचे पैरामिलिट्री फोर्स ला लावून दिलेले 6 महिन्याचे अतिदक्ष प्रशिक्षण शिबीर कर्तव्य भत्ता चे दर मानधनाचा सम प्रमाणानुसार देयक असावेत, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये देखील 3 वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग, वन विभाग किंवा इत्यादी शासकीय प्रशासकीय विभागात 50% आरक्षण सह भरती निवड प्रक्रियेत वयात आणि उंचीत विशेष सवलत देत सरळ भरतीने नेमणूक देण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन होमगार्ड महासंघाच्या वतीने मुंबई येथील आजाद मैदानात आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत होमगार्ड महासंघाच्या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले असून या बाबत चर्चा केली आहे. सदर विषय हा राज्यातील ४५ हजार १७१ होमगार्ड यांचा असून ही संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

या होमगार्ड यांनी होमगार्ड महासंघाच्या नेतृत्वात आझाद मैदानात सुरु केलेल्या आंदोलनाची आपण दखल घेत त्यांच्या रास्त असलेल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..