चंद्रपुरातील या रस्त्यावरील खड्ड्यात नागरिकांनी लावले बेशरमाचे झाड

News34

चंद्रपूर – येथून जवळच असलेल्या महाकाली नगरी क्र.२ गेल्या पाच वर्षांत तयार झालेल्या वस्तीत असलेल्या मुख्य रस्त्यांची अवस्था फारच वाईट असून जागोजागी पाणी साचलेले आहेत. खराब रस्त्यामुळे आणि विजेअभावी रात्रौला अनेकांचे अपघात होत आहे.

महाकालीनगरी ही देवाडा चोराळा आणि हिंगनाळा या गट ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी या नगरीतील अव्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे.‌

भुरट्या चोरांनी सुध्दा येथील लोकांच्या सबमर्शिबल मोटार पंप चो-या करणे सुरु केले आहे. गेल्या तीन वर्षापासून या महाकाली नगरीतील लोक अनेक समस्यांचा सामना करीत आहे. पावसांमध्ये जागोजागी पाणी साचत असून दुचाकी आणि चार चाकी वाहने चालवणे कठीण होत चाललेले आहे.

या समस्या कडे येथील सामाजिक कार्यकर्त्या निशाताई धोंगडे यांनी लक्ष वेधले असून ग्रामपंचायतीला अनेकदा निवेदने सुद्धा दिले परंतु ग्रामपंचायतीने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे.

शेवटी नाईलाजाने येथील निशाताई धोंगडे आणि गावातील नागरिकांनी ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले आहे, त्या ठिकाणी बेशरमच्या झाडांचे वृक्षारोपण करून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीच्या निषेध केलेला आहे. तसेच येथील समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी आग्रहाची मागणी त्यांनी केलेली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!