Thursday, April 25, 2024
Homeग्रामीण वार्तामिशन इंद्रधनुष्य 5.0 लसीकरण मोहिमेला सुरुवात

मिशन इंद्रधनुष्य 5.0 लसीकरण मोहिमेला सुरुवात

लसीकरण मोहिमेची सुरुवात

- Advertisement -
- Advertisement -

News34 गुरू गुरनुले

मुल – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम मिशन इंद्रधनुष्य ५.० या कार्यक्रमाचे उद्घघाटन विधानसभा आमदार प्रतिनिधी ( आरोग्य विभाग) माजी नगरसेवक चंद्रकांत आष्टनकर यांचे शुभहस्ते करुन करण्यात आले.

उदघाटन झाल्यावर या मिशन इंद्रधनुष्य मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मिशन इंद्रधनुष्य मधे लसीकरण सुटलेले बालके ६६ व १७ गरोदर माता यांचे लसीकरण करण्याकरिता वॉर्ड नंबर १४ येथे लसीकरण सत्र आयोजित करून गरोदर माता व बालकांना लस देण्यात आली. व त्याची नोंद संगणक परीचालकाच्या मदतीने U-win portal वर करण्यात आली.

मिशन इंद्रधनुष्य लसीकरण सत्र उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी जी. लाडे ,श्रीमती प्रीती तलोधिकर परिसेविका, श्रीमती वंदना कीलनाके, एएनएम व कू.वैशाली रामटेके स्टाफ नर्स ,श्री गौरव मुपडवार संगणक परिचालक, यांचेसह रुग्णालयातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या मिशन इंद्रधनुष्य लसीकरणाचा लाभ अनेक बालकांनी गरोदर मातानी घेतला.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!