Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूरविद्यार्थ्यांच्या समस्येवर मनसे ने दिला 8 दिवसाचा अल्टीमेटम

विद्यार्थ्यांच्या समस्येवर मनसे ने दिला 8 दिवसाचा अल्टीमेटम

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बसची व्यवस्था करा

- Advertisement -
- Advertisement -

News34

 

चंद्रपूर :- पोंभूर्णा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत शिक्षणासाठी आजु बाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोंभूर्णा येथेच यावे लागते, अनेक विद्यार्थी दहा बारा किलोमीटर अंतरावरील गावातून येत असतात मात्र या विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध नाहि, त्यासाठी या विद्यार्थ्यांना मानसीक तथा शारीरीक त्रास सहन करावा लागतो बऱ्याच महाविद्यालयाची सुट्टी साधारणता एक वाजता होते मात्र या वेळेत कोणतीही बस उपलब्ध नाही.

तसेच बसन्यासाठी बसस्थानकाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना इतरत्र भटकत राहावे लागते मूलींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोणतीही गंभीर घटणा किंवा अनूचीत प्रकार घडु नये विद्यार्थी तासनतास बसची वाट पाहत असतात तेव्हा आपण सदर विद्यार्थ्यांनसाठी वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी, आठ दिवसाचे आत या समस्येचे निराकरण नाहि झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संबधीत विद्यार्थ्यांना घेउन आक्रमक आंदोलन करणार असा इशाराही यावेळेस देन्यात आला.

सदर निवेदन देतांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे, मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आशिष नैताम, मनविसे पोंभूर्णा तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, चंद्रपूर तालूका उपाध्यक्ष प्रविण शेवते, मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, बल्लारपूर तालूका मनसे महिला सेना तालूका अध्यक्षा कल्पना पोर्तलावार तथा मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..