चंद्रपुर जिल्ह्यात शासनाच्या गव्हाची खुल्या बाजारात विक्री

News34

चंद्रपूर/कोरपना – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून शासनाच्या तांदळाची दुसऱ्या राज्यात विक्री करणार मोठं नेटवर्क पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर ही रेशन दुकानदार दुकानातील शासनाच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री करीत आहे, असाच एक प्रकार कोरपना तालुक्यातील धामणगाव येथे नागरिकांनी उघडकीस आणला.

स्वस्त धान्य विक्रेता नामे राजेश दतात्रय ढग्गे यांनी मागील जानेवारी महिन्यापासून गावातील नागरिकांची दिशाभूल करीत लोकांना 9 महिन्यापासून गहू दिले नव्हते. गावातील नागरिक दर महिन्याला गहुची मागणी करीत असता राजेश दतात्रय ढग्गे कडून शासनाकडून गहू आले नाही असे उत्तर मिळत होते. व नागरिक त्यांचा भूलथापांना बळी पडले व याचा फायदा घेऊन राजेश दतात्रय ढग्गेनीं दर महिन्याला येणारे सरकारी गहू विकण्यास सुरू केले.

असाच प्रकार खूप महिन्यापासून सुरू होता पण 27 ऑगस्ट रविवार ला दुपारी 1.00 वाजता गहू विकण्याचा प्रकार सुरू होता, स्वस्त धान्य दुकान बेकायदेशीर विक्री करीत गहुचे कट्टे वाहन क्रमांक MH 34 AB 3064 या चारचाकी वाहनमध्ये गहू भरतांना गावातील नागरिकांच्या लक्षात आले.

ही बाब लक्षात येताच गावातील नागरिकांनीं पोलिसांकडे तक्रार केली. स्वस्त धान्य दुकानदार मागील 9 महिन्यापासून नागरिकांचे हक्काचे गहू विकत आहे. गहू मिळत नसल्याने अनेक जण खाजगी दुकानातून गहू जास्त किमतीत विकत घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. गावामध्ये अनेक नागरिक हे मजूर वर्ग आहेत.

दिवसभर मजुरी करून पैसे कमावतात त्यात शासनाकडून मिळणाऱ्या योजना हे असले चोरटे स्वस्त धान्य दुकानदार शासनाला व नागरिकांना भूलथापा देऊन स्वतःचे खिसे भरत असतात. अश्या दुकानदारांना कठोर शिक्षा व स्वस्त धान्य दुकान परवाना निलंबित करण्यात यावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!