News34
चंद्रपूर – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे समाज हित धोरण स्विकारून शिवसैनिक अमनभाऊ अंधेवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगष्ट २०२३ रोज मंगळवारला
इंदिरा नगर येथे युवासेना शाखा उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिर चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे यांच्या द्वारा आयोजित करण्यात आले होते.
आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले, तब्बल 68 युवकांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. रक्तदान शिबिरांनातर इंदिरा नगर येथे युवासेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी युवतीसेना महाराष्ट्र राज्य सहसचिव रोहिणीताई पाटील, महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेशभाऊ बेलखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शालिकभाऊ फाले, शिवसेना माजी महानगरप्रमुख प्रमोदभाऊ पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख रिझवान पठाण,सुमित अग्रवाल, सुजित पेंदोर, महिला आघाडी जिल्हासंघटीका उज्वलाताई नलगे, माजी जिल्हासंघटीका कुसुमताई उदार, इंदिरा नगर शाखाप्रमुख पराग कुत्तरमारे,उपशाखाप्रमुख श्रीकांत दडमल, शाखा सचिव अमित वाघमारे, शाखा उपसचिव तुषार वारफडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.