Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूरअमृत भारत योजने अंतर्गत होत असलेला रेल्वे स्थानकांचा विकास औद्यागीक जिल्ह्यासाठी वरदान...

अमृत भारत योजने अंतर्गत होत असलेला रेल्वे स्थानकांचा विकास औद्यागीक जिल्ह्यासाठी वरदान ठरेल – आमदार किशोर जोरगेवार

रेल्वे स्थानकाची पायाभरणी

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – चंद्रपूर हा ऐतिहासीक जिल्हा आहे. सोबतच औद्योगिक जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. राज्य भरातून येथे कामगार वर्ग स्थायी झाला आहे. रेल्वे हे त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे. औद्योगिक करणालाही गतीशील करण्यात रेल्वेचे विशेष योगदान राहिले आहे. त्यामुळे अमृत भारत योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांचा होणार असलेला विकास चंद्रपूर जिल्ह्यासह सर्व औद्योगीक जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

अमृत भारत योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर मुख्य रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मागासवर्गीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, रेल्वे स्टेशन प्रबंधक एस. आर देवगडे, रेल्वे अधिकारी सुभाष यादव, जिल्ह सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता कुमरवार, रमनिक चैव्हाण, रेल्वे विभागाचे चिफ कमर्शिअर इन्स्पेक्टर क्रिष्णा कुमार सेन, माजी महापौर राखी कंचर्लावार, विजय राऊत, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटीका वंदना हातगावकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमात पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्याचे ऐतिहासिक धार्मिक, सामाजिक, औद्योगीक असे महत्व आहे. देशात असलेल्या दोन दिक्षाभुमी पैकी एक दिक्षाभूमी चंद्रपूरात आहे. येथे सिमेंट, कोळसा, लोहखनीज असे मोठे उद्योग आहे. येथे 500 हजार मेगावॅट विद्युत निर्मीतीचे केंद्र आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य येथे आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक चंद्रपूरात येत असतात रेल्वे हेच त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे या स्थानकांवर उतरताच त्यांना चंद्रपूरच्या संस्कृतीचे सुंदर चित्र दिसायला हवे असे ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचा विकास होत आहे. या विकासामुळे चंद्रपूरच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. प्रवाशांना आता येथे अधिक सुविधा मिळतील. येणा-या पर्यटकाला पून्हा चंद्रपूरात याव अस वारंवार वाटेल असे संदर रेल्वे स्थानक येथे उभे राहिल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. येथील रेल्वे स्थानकांवर विविध रेल्वे गड्यांचा थांबा असला पाहिजे असे ही यावेळी बोलताना ते म्हणाले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..