जातनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा, महिला सरपंचाने घेतला पुढाकार

News34 obc census

गोंदिया – संपूर्ण देशात ओबीसी जनजातीय जनगणनेची मागणी असताना सुद्धा केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे, याकरिता आता गावागावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून ओबीसी जनगणना व्हावी असा निर्धार तिरखेडी तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया येथील ग्रामपंचायतच्या सरपंच प्रिया मनोज शरणागत यांनी केला आहे.

 

त्या उद्देशाने त्यांनी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत पासून ओबीसी जनगणनेची सुरुवात केली आहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी ग्राम पंचायत तिरखेडी येथील ग्रामसभेत सरपंच प्रिया मनोज शरणागत यांच्या अध्यक्षतेख़ाली ग्रामपंचायत स्तरावर “ओबीसी जातनिहाय जनगणना” करण्याचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

 

देशात स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून 1931 च्या नंतर आजपर्यंत ओबीसी ची जातनिहाय जनगणना झाली नाही. याकडे सर्व सरकारे दुर्लक्ष करतात. केन्द्रच्या गृहखातेद्वारे ही जनगणना केली जाते. पण गृह खाते याकडे लक्ष देत नाही आहे.

 

आता कुणीही हे कार्य करीत नाही म्हणून आता थेट ग्रामपंचायत स्तरावर ही जनगणना करण्यासाठी सरपंच प्रिया मनोज शरणागत यांनी आपल्या गावकर्यांसोबत कमर कसली आहे. व आपल्या गावातूनच आता ओबीसी जनगणनेची सुरुवात व्हावी असा निर्धार केला आहे. त्यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायत च्या सरपंचानी हा निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण स्तरावर ओबीसी समाजातर्फे स्वागत केला जात आहे.

राज्यात व देशात राजकीय परिस्थिती बघता सर्व जनप्रतिनिधी फक्त मतांसाठी ओबीसी व उर्वरित समाजातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचे काम करीत आहे, मात्र एकानेही स्पष्ट जातनिहाय जनगणनेचा पुढाकार घेतला नाही.

मात्र महाराष्ट्र राज्यातील विदर्भातल्या गोंदिया तिरखेडी गावच्या सरपंच यांनी जातनिहाय जनगणनेचा पुढाकार घेत ग्रामसभेत ठराव मंजूर केला, ग्राम स्तरावर जनगणना करून त्याचा अहवाल राज्य व केंद्र सरकारला पाठविणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!