विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे स्थानांतरण

News34 गुरू गुरनुले

मूल – 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदीनाचे औचित्य साधुन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष यांचे नेतृत्वात बांधण्यात आलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था मुलचे कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थानांतर करुन लोकार्पण समारंभ घेण्यात आला.

याप्रसंगी उद्घघाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती मुलचे सभापती मा. राकेशभाऊ रत्नावार यांचे हस्ते
करण्यात आले.

याप्रसंगी उपसभापती राजेंदभाऊ कन्नमवार माजी सभापती व माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष घनशामभाऊ येनुरकर, मुल तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरुभाऊ गुरनुले, वी.वी.कार्यकारी सह.संस्थेचे अध्यक्ष संदिप कारमवार, उपाध्यक्ष अरविंद बोरुले, बाजार समितीचे संचालक किशोरभाऊ घडसे, सुमित आरेकर, क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष धनंजय चिंतावार, संचालिका सौ चंदाताई कामडी व शेतकरी, काँग्रेस महिला कार्यकर्त्या यांचे उपस्थित पार पडला.

नवीन कार्यालयात प्रथम आगमनानिमित्य व संस्थेचे संचालक म्हणून मुल बाजार समितीचे सभापती श्री राकेशभाऊ रत्नावार व उपसभापती राजेंदभाऊ कन्नमवार यांचा संस्थेच्या वतीने पुष्प गुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यानिमित्त सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे संचालन अध्यक्ष संदीप कारमवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्यवस्थापक संजय बद्देलवार यांनी मानले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!