Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूर ग्रामीणचंद्रपुर जिल्ह्यातील या महिला म्हणतात मोदी जी आम्ही सुद्धा तुमच्या बहिणी

चंद्रपुर जिल्ह्यातील या महिला म्हणतात मोदी जी आम्ही सुद्धा तुमच्या बहिणी

40 वर्षांपासून अंधारात राहणाऱ्या महिलांचं पंतप्रधान मोदी यांना पत्र

- Advertisement -
- Advertisement -

News34

 

चंद्रपूर :- मागील 40 वर्षांपासून वीज, पाणी, रस्ता, नाली अश्या मूलभूत गरज्यांच्या अभावात राहणाऱ्या गडचांदूर शहरातील बंगाली कॅम्प येथील बहिणींनी रक्षाबंधन च्या पर्वावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘मोदीजी हमे बिजली, पाणी, रास्ता दो’ अश्या आशयातून आमच्या समस्या सोडवा असे पत्र लिहून पाठवले.

 

कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर नगरपरिषद क्षेत्रातील वार्ड क. 4. बंगाली कॅम्प येथील जवळपास 400 रहिवासी मागील 40 वर्षापासून विज, पाणी, नाली, रस्ते अशा मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत, त्यांच्या वस्तीत विजेचे कनेक्शन नाही, नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही, नाली, रस्ते नाहीत करिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज भाऊ बहिणींच्या रक्षाबंधन या पवित्र सणाच्या पर्वावर नरेंद्र मोदी यांना आपले भाऊ या नात्याने आम्हा बहिणी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या करिता ‘प्रिय मोदीजी, हमे बिजली, पाणी, रस्ता दो’ अश्या मागणीचे पत्र बंगाली कॅम्प वासीय महिलांनी व बालकांनी लिहून पाठवले आहे, सदर कार्यक्रम भारत राष्ट्र समिती च्या वतीने भूषण फुसे यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे, जेष्ठ नेते रामदास चौधरी, महेंद्र ठाकूर, अश्विन वाघमारे तसेच मिथुन घुले, मंगला कुंभारे, लक्ष्मीबाई उंदीरवाडे, काजल मंडल, गोकुल विश्वास, सावित्री देवी पोद्दार, लिलाबाई बारापात्रे, हिराबाई मेकाले आदी स्थानिक बंगाली कॅम्प वासीय, शेकडो महिला भगिनी, बालक व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्षाबंधन या भाऊ – बहिनींच्या पवित्र सणाच्या पर्वावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्ड पाठवून मागणीच्या या अनोख्या स्वरूपाच्या विषयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..