Thursday, December 7, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपुरात ऑटोवर ट्रक झाला पलटी, तिघांचा जागीच मृत्यू

चंद्रपुरात ऑटोवर ट्रक झाला पलटी, तिघांचा जागीच मृत्यू

भीषण अपघात 3 जण जागीच ठार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : बल्लारपूर – चंद्रपूर बायपास मार्गावर ट्रक एका ऑटो वर पलटला असता झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जखमी आहे. ही दुर्देवी घटना रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

 

मृतक मध्ये संगीता चाहांदे (५६, रा. गडचिरोली), अनुषका खेरकर (२२, र. बल्लारपूर), ऑटोचालक इरफान खान (वय ४९, बाबुपेठ) यांचा समावेश आहे.

 

शहरातील अष्टभुजा मंदिराजवळील गोंदिया कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान भिषण अपघात झाला असुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ३४ एम १८१७ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. नेमक्या त्याच वेळी शेजारून जाणारा एक ऑटो क्रमांक एम एच ३४ एम ८०६४ हा ट्रक खाली चिरडला गेल्याने ऑटोतील तीन प्रवाशी जागीच ठार झाले तर तिन लोकांना गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन जखमी प्रवाशांना उपाचाराठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बातमी लिहेपर्यंत पोलीस कार्यवाही सुरू आहे. जखमीमध्ये राजकला मोहूर्ले (वय ३४, रा. बाबुपेठ), गीता शेंडे (वय ५०, रा. तुकुम), दशरथ बोबडे (वय ५०, रा. वणी) यांचा समावेश आहे. घटनास्थळ गाठुन पीएसआय हिवसे यांनी पंचनामा केला.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular