Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरकांग्रेसची जनसंवाद यात्रा हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्याची दुसरी लढाई - नाना पटोले

कांग्रेसची जनसंवाद यात्रा हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्याची दुसरी लढाई – नाना पटोले

नाना पटोले यांची पत्रकार परिषद

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी राज्यात जनसंवाद यात्रेचा कांग्रेस ने शुभारंभ केला, जनसंवाद यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केले.

चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेची सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात 5 सप्टेंबर ला नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती.

 

कांग्रेसच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, जनसंवाद यात्रा मागील हेतू काय? कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या यात्रेबाबत माहिती दिली.

 

नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की वर्ष 2014 मध्ये मोदी सरकार मतदारांना थापा व खोटे आश्वासन देत सत्तेत आले.

आज देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हुकूमशाही, महागाईने सध्या नागरिक त्रस्त झाले आहे. आम्ही नागरिकांना जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून धीर देण्याचं काम करीत आहो, सामान्य नागरिकांशी संवाद साधताना इतकंच जाणवतं की आता परिवर्तन हवं.

जालण्यात झालेला लाठीचार्ज हा शासन पुरस्कृत होता अशी चर्चेमार्फत आम्हाला माहिती मिळाली, मात्र फडणवीस-शिंदे व पवार सरकारने आंदोलनकर्त्यांची माफी मागितली म्हणजेच सरकारचे कुठेतरी चुकले.

विशेष म्हणजे आंदोलन कर्त्यावरील गुन्हे सरकारने मागे घेतले आहे, मराठ्यांना आरक्षण व त्यांना न्याय फक्त कांग्रेस पक्ष देऊ शकतो, मात्र ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देणं म्हणजे एकाच्या तोंडाचा घास दुसऱ्याच्या तोंडात टाकण्याची ही भाषा आहे.

राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ संपला आहे, मात्र निवडणूक अद्यापही सरकारने घेतली नाही, कारण सत्ताधारी पक्षाविरोधात जनतेचा कौल असून सरकार निवडणुकीला घाबरत आहे.

निवडणूक उद्या घेतल्यास कांग्रेस पक्ष हुकूमशाही सरकार विरोधात लढायला तयार बसली आहे.

फडणवीस-शिंदे सरकारमध्ये पुन्हा एक A जोडण्यात आला आहे आता हे येड्यांची सरकार बनली आहे, राज्यात सध्या सुरू असलेल्या पदभरती मध्ये बेरोजगार युवकांकडून फी च्या नावाखाली लूटमार करणे सुरू आहे, आमची सत्ता आल्यास प्रत्येक पदभरती साठी एकच व कमी शुल्क आकारू.

पत्रकार परिषदेत जिल्हा कांग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, शहर कांग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, दिनेश चोखारे यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular