Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरयेत्या निवडणुकीत सरकारला जागा दाखवू - ओबीसी महापंचायत

येत्या निवडणुकीत सरकारला जागा दाखवू – ओबीसी महापंचायत

आता अन्याय सहन करणार नाही

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.

 

जालन्यातील झालेला लाठीचार्ज याचा ओबीसी समाजाने निषेध केला आहे, सरकारने निजामशाही मधील कुणबी समाजाचे दाखले द्या व कुणबी प्रमानपत्र देणार मात्र मराठा समाजाकडे निजामशाही चा पुरावा नसल्याने त्यांनी ओबीसी समाजात सामील करावे अशी मागणी केली.

 

याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपुरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन केले, या महापंचायतीमध्ये ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे वस्तीगृह तात्काळ सुरू करा व मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये असे ठराव मांडण्यात आले.

 

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्या, आधीच ओबीसी(विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, जर त्यांच्याकडे निजामशाही चे दाखले पुरावे असतील तर त्यांना आरक्षण द्या पण सरसकट नको, मराठा समाजाने आजपर्यंत मोठे मोर्चे काढले आता आपल्याला एकत्रित होण्याची वेळ आली आहे.

 

ओबीसी समाजाला मोठा मोर्चा काढायचा आहे यासाठी प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाच्या बैठका लावा, मोर्च्यांचे नेतृत्व आपल्याला करायचं आहे.

 

ओबीसी महापंचायतीमध्ये सोमवार 11 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करणार आहे. 17 सप्टेंबर ला ओबीसी समाजाचा महामोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार आहे.

ओबीसी महापंचायती मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ, तेली महासंघ, माळी महासंघ व विविध राजकीय पदाधिकारी सहित एकूण 20 संघटना सामील झाल्या होत्या.पंचायत मध्ये बबनराव फंड, अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर ,माजी देवराव भांडेकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, संदीप गिरे, सतीश भिवगडे, पुरुषोत्तम सातपुते, अरुण तीखे,शाम लेडे, रजनी लेडे, डॉ संजय घाटे, अनिल धानोरकर, सूर्यकांत, खनके मनीषा बोबडे, गणेश आवारी, अविनाश पाल ,निलेश बेलखेडे, रवींद्र टोंगे, राजेंद्र खांडेकर, अजय बलकी, हितेश लोडे, अनिल डहाके आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular