चंद्रपुर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लरच्या परवान्याची तपासणी होणार

News34 impact

चंद्रपूर – जिल्ह्यात सुरू असलेले नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

 

News34 च्या वृत्तानंतर पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला, स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचे धाडसत्र सुरू केले, पार्लर संचालक यांच्या परवान्यात अनेक त्रुट्या आढळल्याने पोलिसांनी मशीन जप्त केल्या.

 

आता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सुद्धा प्रशासनाला जिल्ह्यात सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने तपासण्याचे आदेश पोलीस व तहसीलदार यांना दिले आहे, यासाठी त्यांनी पथक तयार केले असून 15 ऑक्टोबर च्या आता तपासणीचा संपूर्ण अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले आहे.

 

हे असतील तपासणी पथकातील प्रमुख सदस्य

पोलीस स्टेशन रामनगर हद्द – तहसीलदार व पोलीस निरीक्षक

शहर पोलीस स्टेशन, दुर्गापूर, पडोली, बल्लारपूर व इतर तालुक्यात पोलीस निरीक्षक/सहायक पोलिस निरीक्षक व तहसीलदार हे या समितीचे प्रमुख सदस्य असतील.

पथकाचे काम काय?

व्हिडीओ गेम पार्लर च्या परवान्याच्या जागेत बदल झाला काय?

परवण्यातील नमूद वेळ पाळतात काय?

परवान्यात दर्शविलेल्या संख्ये इतकी मशीन पार्लर वर लावण्यात आली की अतिरिक्त मशीन लावण्यात आले?

पार्लर मध्ये इतर काही अवैध व्यवसाय चालतात काय?

परवान्याच्या अटी-शर्तीचे भंग होत आहे काय?

हे सर्व रीतसर तपासून पथकातील सदस्यांनी मुद्देनिहाय तपासणी करीत संयुक्तरित्या अहवाल 15 ऑक्टोबर च्या आत जिल्हाधिकारी यांना सादर करावा असे लिखित आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.

 

विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून सदर व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, पार्लर चालक हे राजकीय पक्षाशी जुळून असल्याने त्यांनी अनेक नियमबाह्य कामे करीत कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे.

News34 च्या बातमीनंतर आता या नियमबाह्य कामाला काही प्रमाणात चाप बसणार हे निश्चित झाले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!