Sunday, September 24, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांने सवलतीच्या दरात मिळेल वीज पण या अटीवर

चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांने सवलतीच्या दरात मिळेल वीज पण या अटीवर

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -

News34 ganesh utsav 2023

चंद्रपूर :- सार्वजनिक गणेश उत्सवमंडळांनी सवलतीच्या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.
धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आलेला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंग चीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते. Mahavitran

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात.विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावेतयार करावेत.

त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्येत तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

तातडीच्या मदतीसाठी संपर्क करा

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यानी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक१९१२०, १९१२,१८००२१२३४३५ किंवा१८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच चंद्रपूर मंडळातील ग्राहकांनी ७८७५७६११९५ व गडचिरोली मंडळातील ग्राहकांना ७८७५००९३३८ क्रमांकावर मदत मिळेल. याशिवाय संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईलक्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..