Saturday, September 23, 2023
Homeगुन्हेगारीचंद्रपूर शहरातील गोलबाजारात हत्या

चंद्रपूर शहरातील गोलबाजारात हत्या

तीक्ष्ण हत्याराने वार करीत हत्या

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – 3 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरातील गोल बाजार परिसरात भिख मांगणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली.

65 वर्षीय मधुकर मंदेवार रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे, गोल बाजार परिसरात मधुकर हा भिक मांगत होता.

 

सदर घटना ही सकाळी 7 ते 7.30 च्या दरम्यान उघडकीस आली, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे, मृतक मधुकर वर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची माहिती आहे.

गोल बाजार परिसरातील दुकानदार मधुकर ला नामदेव म्हणून हाक मारीत होते, मात्र आता या घटनेनंतर बाजार परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहर पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजपूत आदि दाखल झाले होते.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..