News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – कृषी महाविद्यालय मुल द्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची नववी बैठक दिनांक २० सप्टेंबर २०१३ रोजी येसगाव ता. मुल येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. टेकाळे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्षमा विजय गुरनुले, शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यत्वे ‘ खरीप पिकावरील किडी व रोगांची ओळख व योग्य नियोजन या विषयावर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी किटकशास्त्रज्ञ डॉ. अर्चना बोरकर यांनी धानपिकावर खोडकिडीचे व तुडतुडे या किडींच्या व्यवस्थापनाबद्दल सविस्तर माहिती दिली. धान पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून पाने गुंडाळणारी अळी व तुडतुडे प्रभावित झाडांवर त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाय सुचवले. तसेच किटकनाशकांचा अति वापर टाळावा व जैविक कीटकनाशकांचा वापर करावा असे सांगितले. डॉ. प्रविणा दरडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ यांनी कापूस, तूर आणि धान पिकावरील रोगांची ओळख कशी करावी व त्यांचे नियोजन कसे करावे या बद्दल सविस्तर माहिती पटवून दिली.
कापूस, तूर आणि धान या पिकात रोग प्रसार होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्या या बद्दल मार्गदर्शन केले. धान पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून जीवाणूजन्य कहा करपा रोगाचे लक्षण दिसून आले व त्यावर डॉ. बरडे ह्यांनी उपाययोजना सुचविल्या. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. दिनेश नवलकर यांनी शेतकन्यांनी विचारलेल्या प्रश्नानुसार प्रामुख्याने धान पिकात सद्यस्थितीत खर्गे पडत आहेत. त्याच्या नियोजनासाठी शेतकन्यांनी आपल्या शेतात दर दोन वर्षांनी डिसेंबर महिन्यामध्ये नांगरणी करावी म्हणजे खर्गे पडणार नाही असे सांगितले.
कापसाच्या भारपोस उत्पादनासाठी नत्र, स्फुरद, पालाश आणि मॉग्नेशियम सल्फेट चा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर करावा असे सुचविले तसेच तूर आणि धान पिकातील अन्नद्रव्य कमतरतेवर सुद्धा उपाय सुचविले. कृषीविद्या शास्त्रज्ञ डॉ. विजय राऊत यांनी धान पिक सध्या दाने भरण्याच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे सोबत तण नियंत्रण सुद्धा करावे याविषयी सविस्तर माहिती दिली. उद्यानविद्या शास्त्रश डॉ. स्वप्नील देशमुख यांनी शास्त्रीय पद्धतीने कांदा लागवड कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
तसेच फुलपीक लागवडीचे फायदे, फुलांच्या विविध जाती व त्यांची लागवडीची पद्धत याबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमास एकुण २४ शेतकरी व शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. विजय राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.