Thursday, December 7, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपूर गणेश विसर्जन सोहळ्यात दादागिरी

चंद्रपूर गणेश विसर्जन सोहळ्यात दादागिरी

सामान्य नागरिकांना आया-बहिणीच्या शिव्या

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – दरवर्षी उत्साहात पार पडणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याला यंदा गालबोट लावण्याचे काम करीत पोलीस उपनिरीक्षकाने सामान्य माणसाला बदडण्याचे काम केले आहे.

 

हा प्रकार शहरातील प्रियदर्शिनी चौकात घडला, गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याला लाखो नागरिक आपली उपस्थिती दर्शवितात त्यामुळे फेरीवाले सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी आपली दुकाने लावतात.

 

प्रियदर्शिनी चौकात चप्पल विक्रेत्याने आपली दुकान लावली मात्र त्यावेळी बंदोबस्तात असलेले रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव यांनी आपल्या खाकीचा जोर दाखवीत त्या चप्पल विक्रेत्याला दुकान तात्काळ बंद करण्यास सांगितले.

 

दुकान विक्रेत्याने जाधव यांना विनवणी केली मात्र त्यांनी त्यांची विनवणी फेटाळून लावली, इतक्यात त्यांचे ओळखीचे व नात्यातील पत्रकार यांना कॉल लावला असता आपण थोडे साहेबांशी बोला म्हणत जाधव यांच्याकडे मोबाईल दिला, यावर जाधव हे चवताळले व कोण तो पत्रकार म्हणत त्याला आणा माझ्यापुढे असे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळी करीत चप्पल विक्रेता व त्याच्या मुलाला मारहाण करणे सुरू केले.

 

आता पोलीस सरळ पत्रकारांना ही बदडण्याची भाषा करू लागले आहे, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांचा इतिहास पूर्णतः वादग्रस्त आहे, मात्र त्यांनी दरवर्षी उत्साहात पार पडणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्याला गालबोट लावण्याचे काम करीत सामान्य नागरिकांवर खाकी ची दबंग गिरी दाखविण्याचे काम केले आहे.

 

जिल्ह्यात व शहरात गुन्हेगारी वाढत आहे, त्यावर हे महाशय गंभीर नसतात मात्र विनाकारण कुणावरही वर्दीचा धाक दाखविण्यात मागे पडत नाही, सदरक्षणाय खलनिग्रहनाय या पोलीस विभागाच्या ब्रीद वाक्याचा अपमान हे पोलीस अधिकारी करू लागले आहे.

 

विशेष म्हणजे जाधव हे आधी ब्रह्मपुरी, कोरपना, वाहतूक शाखा व त्यानंतर कंट्रोलमध्ये सेवा दिली मात्र त्यांचं कुठेही जमलं नाही अखेरीस ते रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाले पण आता त्यांनी हा प्रताप केला, जाधव साहेब नागरिकांना आया-बहिणीच्या शिव्या देऊन काय भेटणार आहे?

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular