चंद्रपूर जिल्ह्यात असं काय घडलं? पोलीस अधीक्षकांना करावं लागलं हे आवाहन

News34 chandrapur

चंद्रपूर – वन्यजीव व प्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, त्यासाठी शेतकरी ताराच कुंपण करीत त्यामध्ये जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे मात्र आता तशी चूक कराल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्या वन निसर्गाने वेढलेला जिल्हा आहे, अनेक वन्यप्राणी या निसर्गात वास्तव्यास आहे मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करण्यासाठी हे प्राणी शेतात जात पिकांची नासाडी करतात.

या वन्य प्राण्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी शेतात जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे वर्ष 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत तब्बल 13 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, सदर 12 प्रकरणात शेत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, विशेष म्हणजे काही प्रकरणात स्वतः शेतमालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

 

याकरिता शेत मालकांनी शेतात जिवंत विजेचा प्रवाह सोडु नये जर असे केल्यास या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील शेत मालकांनी असा प्रकार करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!