Thursday, May 23, 2024
Homeचंद्रपूर शहरयुवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांचा SP कॉलेजला दणका

युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांचा SP कॉलेजला दणका

विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या सरदार पटेल महाविद्यालयात दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख अडबाले यांच्यामुळे कमी झाला.

 

30 सप्टेंबरला युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांना महाविद्यालयात होत असलेल्या त्रासाबद्दल विद्यार्थ्यांनी तक्रार केली, तक्रार प्राप्त होताच अडबाले SP कॉलेजमध्ये दाखल झाले, त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या लांबलचक रांगा बघितल्यावर त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला दरवर्षी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

 

कारण याठिकाणी अर्ज भरण्यासाठी एकच काउंटर लावण्यात आला आहे, शैक्षणिक वर्षात बाहेरगावातून हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी येतात मात्र महाविद्यालय प्रशासन त्यांची व्यवस्थित सोय करीत नाही, ज्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक सत्राला मुकतात.

 

विद्यार्थ्यांची समस्या ऐकल्यावर सुर्या अडबाले यांनी प्राचार्यांच्या कक्षात धडक मारत त्यांना या समस्येबाबत अवगत केले, प्रवेश काउंटर वाढविण्याची मागणी प्राचार्याला केली.

 

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर युवासेनेची आक्रमकता बघता महाविद्यालय प्रशासनाला नमावे लागले, त्यांनी तात्काळ त्याठिकाणी 4 काउंटर सुरू केले.

 

तात्काळ समस्या दूर होताच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!