Wednesday, November 29, 2023
Homeचंद्रपूर ग्रामीणचंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसचा सत्याग्रह मार्च

चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसचा सत्याग्रह मार्च

चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस च्या वतीने घुगूस येथे काढण्यात आला सत्याग्रह मार्च

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर: केंद्रातील मोदी सरकारने 33%आरक्षण विधेयक लागू केले पण ते कधी पासून लागू होईल याची काही शाश्वती नाही. तसेच महिला खेळाडू अनेक महिने आंदोलन करत असतांना मोदी सरकारने त्याची दखल घेतली नाही, मणिपूर मध्ये १५० दिवस महिलांवर अत्याचार सुरू असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत होते. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी मा.गांधी जयंती साप्ताहाचे औचित्य साधून अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या अध्यक्ष नेटा डीसुजा यांच्या निर्देशानुसार तसेच महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर महिला काँग्रेस ग्रामीण च्या वतीने घुगस इथे सत्याग्रह मार्च करण्यात आला.

 

महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य- ठेमस्कर यांच्या नेतृवात हा सत्याग्रह मार्च काढण्यात आला. यावेळी घुगूस काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजू रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.
घुगूस काँग्रेस कमिटीचे कार्यालय ते गांधी चौक पर्यंत हा सत्याग्रह मार्च शांततेत कोणत्याही घोषणा न देता काढण्यात आला.

 

गांधी चौक येथे या सत्याग्रह मार्च चा समारोप झाला. यावेळी बोलतांना नम्रता आचार्य- ठेमस्कर यांनी महिला आरक्षण हे केंद्र सरकारने दिलेले गाजर आहे अशी टीका केली. त्याच सोबत मणिपूर जळत असतांना तसेच महिला खेळाडू आंदोलन करत असतांना मात्र हे मोदी सरकार का गप्प बसले होते यांच्या महिला मंत्री का गप्प बसल्या होत्या. असा सवाल यावेळी ठेमस्कर यांनी केला. पण मोदी सरकारच्या या भूल थापांना या देशातील महिला भुलणार नाही. त्या मुळे येणाऱ्या निवडणुकात या देशातील महिला मोदी सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा देखील ठेमस्कर यांनी यावेळी दिला. तसेच शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी मोदी सरकार महिला विरोधी आहे, त्यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या सगळ्या योजना अयशस्वी झाल्या आहेत, त्यामुळेच मोदी सरकारने हे महिला विधेयक आणलं अशी सडेतोड टिका केली.

 

या सत्याग्रह मार्च मध्ये चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस चंद्रपूर तालुका अध्यक्ष शितल कातकर, घुगूस शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संगीता बोबडे, उपाध्यक्ष यास्मिन सय्यद, महासचिव पद्ममा त्रिवेणी, महासचिव पुष्पा नक्षणे, सचिव मंगला बुरांडे, सचिव दुर्गा पाटील, सचिव माला माणिकपुरी, सचिव श्रुती कांबळे, अनुसूचित विभागाच्या महिला शहर अध्यक्ष दीप्ती सोनटक्के, सरस्वती कोवे, सुजाता सोनटक्के, पूनम कांबळे, अनवर सय्यद,सोशल मिडिया चे शहर अध्यक्ष रोशन दंतलवार, अलीम शेख, विशाल मादर, रोहित डाकुर, अरविंद चहांदे, सुनील पाटील यांच्या सह बहुसंख्य महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular