राज्याची आरोग्य यंत्रणा आयसीयू मध्ये – डॉ. अभिलाषा गावतुरे

News34 chandrapur

चंद्रपूर – नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर शिंदे गटाच्या खासदाराने नांदेड येथील डिन ला टॉयलेट स्वच्छ करायला लावले, त्यांनतर वैद्यकीय क्षेत्रातुन खासदारांचा निषेध नोंदविण्यात आला, खासदारावर गुन्हे दाखल झाले असले तरी रुग्णालयात घडलेल्या मृत्यूच्या तांडवाला डिन जबाबदार कसे? या संपूर्ण घटनेला देश व राज्यातील आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे, राज्यातील आरोग्य यंत्रणा आयसीयू मध्ये एडमीट झाली आहे, राज्यातील घटनेची जबाबदारी घेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

ठाणे नंतर नांदेड मधील घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मात्र याला जबाबदार केंद्र व राज्याची आरोग्यव्यवस्था आहे, आजही राज्यातील शासकीय रुग्णालयात अनेक पदे भरल्या गेली नाही, देश व राज्याच्या अर्थ संकल्पात आरोग्य व्यवस्थेवर निधीची तरतुद दिवसेंदिवस कमी होत आहे, आरोग्य यंत्रणेत असणारे प्रशासकीय अधिकारी हे आयएएस असतात मात्र त्यांना आरोग्य व्यवस्थेचे पुरेसे ज्ञान नसते त्यामुळे अश्या घटना राज्यात घडत आहे अशी प्रतिक्रिया बहुजन मेडिकल असोसिएशच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी दिली.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजही अनेक पदे रिक्त आहे, 190 सफाई कर्मचाऱ्यांपैकी एकही पद भरल्या गेले नाही, 350 परिचारिका पैकी फक्त 97 परिचारिका वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहे, प्राध्यापकांचे अनेक पदेही आज रिक्त आहे, चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे शिकाऊ डॉक्टरच्या भरवश्यावर आहे, चंद्रपुरातील आरोग्य व्यवस्थेला लोक प्रतिनिधी पूर्णतः जबाबदार आहे, एकही लोकप्रतिनिधी पालकमंत्री असो की आमदार यांनी मुळीच लक्ष दिलेले नाही, नांदेड, ठाणे जिल्ह्यासारखं मृत्यूचे तांडव चंद्रपुरात घडायची वाट तर हे लोकप्रतिनिधी बघत असावे अशी शक्यता आम्हाला वाटते.
स्थानिक आमदार हे सत्तेसाठी सुरत ते गुवाहाटी चा प्रवास करतात मात्र रुग्णालयात रुग्णांची काय परिस्थिती आहे हे कधी जाणून घेत नाही.

 

या सर्व परिस्थिती बाबत बहुजन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे व डॉ. राजू ताटेवार यांनी अधिष्ठाता फुलपाटील यांची भेट घेतली व आरोग्य व्यवस्थेची तात्काळ सुधारणा करावी असे निवेदन त्यांना देण्यात आले.

 

अभिलाषा गावतुरे यांनी पुढे माहिती दिली की शिंदे गटाच्या खासदार हेमंत पाटील यांनी केलेले हे कृत्य क्षमयोग्य नाही, आपली कमतरता लपविण्यासाठी अधिष्ठाता यांना जबाबदार धरणे हे चुकीचे आहे, या घटनेचा बहुजन मेडिकल असोसिएशनने निषेध करीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

 

पत्रकार परिषदेला बहुजन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर अभिलाषा गावतुरे, डॉक्टर राजू ताटेवर, डॉक्टर राकेश गावतुरे, डॉक्टर राकेश वनकर, डॉक्टर नम्रता बेंडले, डॉक्टर समृद्धी वासनिक, डॉक्टर जावेद शेख, डॉक्टर स्नेहल खोब्रागडे, डॉक्टर प्रीती उराडे व डॉक्टर समीर कदम उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!