Thursday, May 23, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपुरात ऑटोरिक्षा चालकांना गणवेशाचे वितरण

चंद्रपुरात ऑटोरिक्षा चालकांना गणवेशाचे वितरण

ऑटोरिक्षा व्यवसायातून समाजसेवेचे व्रत स्वीकारावे- हंसराज अहीर

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर-ऑटोरिक्षा व्यवसायातून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करण्यापुरते किंवा प्रवाशांची सेवा एवढेच सिमीत कर्तव्य पार न पडता चंद्रपूर जिल्हा ऑटो चालक-मालक संघटनेतील ऑटोचालकांनी सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यातून आपल्या कर्तव्याला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

 

एक जबाबदार नागरिक म्हणुन समाजाच्या हितासाठी त्यांचेही योगदान फार मोलाचे असल्याने ऑटोरिक्षा व्यवसायिंनी व्यवसायाबरोबरच सामाजिक हितासाठी त्यांचेही योगदान फार मोलाचे असल्याने ऑटोरिक्षा व्यवसायिंनी व्यवसायाबरोबरच सामाजिक ऋणाची परतफेड करण्यास सदैव कार्यरत राहावे असे विचार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

 

वियजादशमीच्या शुभमुहूर्तावर हंसराज अहीर यांनी दि. 24 ऑक्टोंबर रोजी आपल्या निवासस्थानी ऑटो चालक बांधवाना गणवेश वितरीत केले त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, भाजपा ओबीसी मोर्चाचे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, दामोधर मंत्री, ‘श्यामल अहिर, तेजस चौधरी, अजय अहीर , हर्षवर्धन अहीर, आदित्यवर्धन अहीर, ऑटो चालक-मालक संघटनेेच संस्थापक राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, जिल्हा संघटक सुनिल चन्ने, रवी आंबटकर, जनार्धन गुंजकर, अरविंद उमरे, अंकुश कौरासे, रमेश वझे, किशोर वाटेकर, वासुदेव कुबडे, मंगेश चवरे, महेश ढेकरे, विश्वास वैद्य, अब्दुल रहीम, विजय मडावी, सुनिल देऊळकर, गजान बाबर, वामन टोंगे, नासीर शेख, प्रदिप वरभे, शरद मेश्राम, युनुस शेख, शाकीर शेख, महादेव शेंडे यांचेसह आदींची उपस्थिती होती.

 

ऑटोरिक्षा हा व्यवसाय असला तरी हे क्षेत्र एकप्रकारे सेवेचे साधन आहे. समाजात अनेक ऑटो चालकांनी आपल्या सहृदयतेच्या वेळोवेळी परिचय दिला आहे. रंजल्या गांजल्यांना, वृध्दांना सेवा दिली आहे. अनेकांना मानवतेचे दर्शन घडविले आहे. हा धर्म त्यांनी मानत आपल्या सेवेला समाजाभिमुखतेची जोड द्यावी असे आवाहन अहीर यांनी केले.

 

ऑटोरिक्षा चालकांच्या अडचणी त्यांचे प्रश्न त्यांच्या समोरील समस्या सोडविण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी कायम उभे राहु अशी भावनाही अहीर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. विश्वास हा ऑटो व्यवसायींसाठी अलंकार असून तो ग्राहकांच्या नजरेतून ढळु न देण्याची काळजी ऑटो व्यवसायी बांधवांनी घ्यावी असेही ते म्हणाले.
यावेळी हंसराज अहीर यांनी शहरातील ऑटोरिक्षा चालक बांधवांना गणवेशाचे वितरण केले त्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!