Thursday, December 7, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपुर शहरात दारू पिऊन दुचाकीवर युवकांचा धिंगाणा, दोघांचा मृत्यू

चंद्रपुर शहरात दारू पिऊन दुचाकीवर युवकांचा धिंगाणा, दोघांचा मृत्यू

चंद्रपूर शहरातील अपघात अनियंत्रित

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील 4 दिवसात घडलेल्या दुचाकी वाहनांच्या अपघातात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे.

 

मृतांमध्ये 8 वर्षीय बालकाचा समावेश आहे, पहिला अपघात 20 ऑक्टोबर ला बाबूपेठ येथे घडला, यामध्ये ट्रिपल सिट वाहनांवर मस्ती करीत असलेल्या मुलांनी दुचाकी वाहनाला जबर धडक दिली, या धडकेत 8 वर्षीय विहान बोरकर या मुलाचा मृत्यू झाला.

22 ऑक्टोबर ला शहरातील रामसेतू पुलाजवळ झालेल्या अपघातात लहुजी नगर निवासी 2 युवकांचा समोरासमोर झालेल्या धडकेत मृत्यू झाला, मृतक युवक आपले वाहन वेगात चालवीत होते, वाहनवरून नियंत्रण सुटल्याने समोरून येत असलेल्या दुचाकीला त्यांनी जबर धडक दिली.

 

23 ऑक्टोबर ला लखमापूर येथील 3 युवक दारूच्या नशेत दुचाकी वाहनांवर ट्रिपल सिट जात असता त्यांचे वाहनवरून नियंत्रण सुटले.

दुपारी 2 वाजता लखमापूर येथील जितू सिन्हा, 23 वर्षीय चेतन दुर्वे व 28 वर्षीय संतोष साहू हे आपल्या दुचाकी वाहनाने लखमापूर येथे जात होते.

 

दारूच्या नशेत असलेले युवक अतिवेगात वाहन चालवीत होते, विद्या निकेतन शाळेसमोर पोहचताच काही वेळात त्यांचे वाहनावरून नियंत्रण सुटले, आणि दुचाकी डिव्हायडर ला घासत निघाली, काही क्षणात तिघेजण दुचाकीवरून फेकल्या गेले, मात्र त्यानंतर दुचाकी वाहन तब्बल 100 मीटर चालत गेले.

 

प्रत्यक्षदर्शी यांच्या नुसार युवकांच्या वाहनाचा वेग हा 100 किलोमीटर पेक्षा जास्त होता, या अपघातात चेतन दुर्वे व संतोष साहू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर जितू सिन्हा किरकोळ जखमी झाला. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून युवक धूम स्टाईल वाहने चालवीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, यावर आता आळा घालणे गरजेचे झाले आहे, आता तर रस्त्यावर पायदळ चालणारे नागरिकही बाईक रेसर वाहन चालकापासून सुरक्षित नाही.

सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट करीत आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular