Monday, May 27, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपुर शहरात दुचाकीवर खोडकर मुलांची मस्ती आणि घडला भीषण अपघात

चंद्रपुर शहरात दुचाकीवर खोडकर मुलांची मस्ती आणि घडला भीषण अपघात

8 वर्षीय मुलाचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – नवरात्र निमित्त विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, शुक्रवारी रात्री महाप्रसादाचा लाभ घेऊन घरी परतताना पिता-पुत्राचा भीषण अपघात झाला, या अपघातात 8 वर्षीय मुलगा ठार झाला असून वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

 

दोन दुचाकींच्या अमोरासमोर झालेल्या धडकेत सात वर्षीय बालक ठार झाला असून त्याचे वडिल आणि अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर-जुनोना मार्गावरील साई मंदिराजवळ शुक्रवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडला. विहान मनोज बोरकर असे मृतक बालकाचे नाव आहे. तर मनोज भाऊराव बोरकर आणि शिवान निशिकांत येनुरकर हे दोघे जखमी झाले आहे.

मनोज बोरकर हे सात वर्षीय मुलगा विहानला दुचाकीवर बसवून घराकडे दुचाकीने जात होते. तर विरुद्ध दिशेने शिवान येनुरकर रा. मराठा चौक बाबूपेठ हा युवक दुचाकी क्रमांक एमएच ३४/बीडब्लू ३३८१ ने येत होता. या दोन्ही दुचाकींची साईमंदिराजवळ जोरदार धडक झाली. यात 8 वर्षीय बालक विहान बोरकर हा दुचाकीवरून उसळून डांबरी रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तर वडिल मनोज बोरकर गंभीर जखमी झाले आहे. शिवान येनुरकर यालाही गंभीर दुखापत झाली असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकोडे करीत आहेत

मनोज बोरकर हे बाबूपेठ येथे भाड्याच्या घरात राहत होते, काही खोडकर मुलांच्या दुचाकीवरील मस्तीने पिता पुत्राचा भीषण अपघात घडल्याने 8 वर्षीय विहान ला आपला जीव गमवावा लागला, चंद्रपुर शहरात अल्पवयीन मूल अतिवर्दळीच्या मार्गावरून फिल्मी स्टाईल ने दुचाकी अतिवेगात चालवितात, मात्र यावर वाहतूक विभाग काही ठोस कारवाई करीत नाही.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!