News34 chandrapur
वरोरा – कांग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी माना समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माना समाजाच्या वतीने मोघे यांच्या विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला.
नागपुरात आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रमात शिवाजी मोघे यांनी माना समाजाबद्दल म्हटले की आमची सरकार आली तर हाय पावर कमिशन नेमत त्यामध्ये चुकीने ज्या जाती समाविष्ट झाल्या आहे, त्यामध्ये माना जमात आहे, त्याला बाहेर काढा असे चुकीचे वक्तव्य मोघे यांनी केले होते.
विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात माजी मंत्री राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी आमदार नामदेव उसेंडीउपस्थित होते, या दोन्ही कांग्रेस नेत्यांच्या विधानसभा क्षेत्रात माना समाज मोठ्या प्रमाणात असून सुद्धा त्यांनी त्यावेळी मोघे यांनी चुकीचे वक्तव्य केले याबाबत साधी नाराजी सुद्धा व्यक्त केली नाही.
मोघे यांचा विविध ठिकाणी विरोध सुरू आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे 1 ऑक्टोबरला मोघे विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला, मोर्च्यात माना समाजाचे नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित झाले होते.
यावेळी आदिवासी माना समाज विद्यार्थी युवा संघटन महाराष्ट्र, आदिम माना जमात मंडळ व माना जमात विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्च्यात उपस्थित समाजातील नागरिकांना मार्गदर्शन केले.
भविष्यात माना जमातीबद्दल असे वक्तव्य केल्यास लोकशाही मार्गाने विरोध केल्या जाणार असा इशारा यावेळी देण्यात आला, उपस्थित माना समाज बांधवांनी वरोरा पोलीस स्टेशनला शिवाजी मोघे व राहुल गांगुर्डे विरोधात तक्रार दाखल केली.
याप्रसंगी प्रकाश झाडे, विनोद खडसान, निखिल राणे, पियुष गजबे यांनी तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम यांना निवेदन देण्यात आले.