Thursday, December 7, 2023
Homeचंद्रपूररमाई घरकुल, इंदिरा आवास व शबरी घरकुल योजनेच्या निधी पाच लाख रुपये...

रमाई घरकुल, इंदिरा आवास व शबरी घरकुल योजनेच्या निधी पाच लाख रुपये करण्यात यावे – कांग्रेसची मागणी

महागाईत घराचे बांधकाम रखडले

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल:- महाराष्ट्र शासनाने कित्येक वर्षापासून रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, शबरी घरकुल योजनांचे शासनाकडून मिळणारे अनुदान जुन्याच पद्धतीने दिले जात असून वाढती महागाई,मजुरीचे दर लक्षात न घेता केवळ १५००००/- (दीड लाख रुपये) दिल्या जात आहे.

 

परंतु हा निधी घरकुलाच्या पाया बनवण्यातच खर्च होत असल्याने घर बांधकाम करण्यासाठी घरकुल लाभार्थ्याला कर्ज काढून घर बांधावे लागत. परंतु गरिबीमुळे त्याला कर्ज फेडता येत नाही अशी अवस्था घरकुल लाभार्थ्याची झाली आहे. घरकुलाच्या निधीत पाच लाख रुपये ५०००००/-(पाच लाख रुपये) करण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेसद्वारे राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे मुल तहसीलदार यांचे मार्फत करण्यात आली.रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, शबरी घरकुल योजना या सर्व योजनांचे अनुदान निधी महाराष्ट्र राज्य शासनाकडून मागील कित्येक वर्षापासून १५००००/-(एक लाख पन्नास हजार रुपये) मिळत आहे.

 

रेती, सिमेंट, विटा, लोहा व मजुरी याचे भाव कमी असताना या तुटपुंज्या अनुदानात लाभार्थी कसेबसे घर बांधत होते. परंतु आता महागाईचा भडका कितीतरी पटीने वाढलेला असून गरीब लाभार्थ्यांना निव्वळ दीड लाख रुपये अनुदानात घर बांधणे कठीण झालेले आहे. आजच्या काळात रेती, सिमेंट, विटा, लोहा व मजुरीचे दर लाभार्थ्यांना परवडेनासे झाले आहे. अशातच घरकुल मंजूर करणे, बिले काढणे, बिलांसाठी तालुका कचेरीवर चकरा मारणे यामध्येही गरीब लाभार्थ्याला पैसे द्यावे लागते.

 

काही संबंधित अधिकारी व पदाधिकारी आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय बिले काढत नाही. याचाही फटका गरीब लाभार्थ्यांना बसतो. त्यामुळे आजच्या महागाईच्या दृष्टिकोनातून विचार करता शासनाने घरकुलाच्या लाभार्थ्यांना ५०००००/- (पाच लाख रुपये) अनुदान द्यावे जेणेकरून एक छोटसं घर गरीब लाभार्थ्यांना बांधता येईल. या मागणीला घेऊन निवेदन देण्यात आले. सदर मागणीची तात्काळ शासकीय व प्रशासकीय स्तरावरून दखल घेऊन पाठपुरावा करावा व ५०००००/- (पाच लाख रुपये)निधी मंजूर करावा. जर सदर मागणी मान्य झाली नाही तर शासनाला व प्रशासनाला यासंबंधी जाग येण्यासाठी काँग्रेस कडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनास देण्यात आला.

 

निवेदनाच्या प्रती राज्याचे विरोधी पक्षनेते नाम.विजय वडेट्टीवार, जिल्ह्याचे पालक मंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना देण्यात आले. निवेदन देताना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरुदास गुरगुले, प्रशांत उराडे युवक काँग्रेस,ओबीसी सेल काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक पाटील वाढई, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन नीलमवार, धनराज रामटेके,गुरुदास चौधरी,किशोर पेंदाम, विक्रम गुरनूले,शाम पुठ्ठावार कथा काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular